असाल श्रीमंत तर, भरा जास्त कर!- अजित पवार

राज्याचा वाढणारा खर्च आणि मिळणारे महसूली उत्पन्न यातली तफावत दूर करण्यासाठी श्रीमंतावर जादा कर आकारण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याचे संकेत दिले आहेत.

Updated: Mar 1, 2012, 05:22 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्याचा वाढणारा खर्च आणि मिळणारे महसूली उत्पन्न यातली तफावत दूर करण्यासाठी श्रीमंतावर जादा कर आकारण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याचे संकेत दिले आहेत.

राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात श्रीमंतांवर जादा कर आकारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यावरचा कर्जाचा बोझा दोन लाख ७ हजार कोटीपर्यंत गेला आहे. तर दुसरीकडे खर्चातही प्रचंड वाढ झाली. वाढत्या खर्चामुळे कर्ज फेडताना सरकारला बरीच कसरत करावी लागतेय.

त्यामुळे शहरी भागात राहणाऱ्या उच्च मध्यमवर्गीयांवर जादा कराचा बोझा टाकणार असल्याचे सूतोवाच अजित पवारांनी केलंय. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केल्याचंही ही त्यांनी सांगितलं आहे.