राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे विजयी

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातही राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी 4200 मतांची आघाडी घेतली आहे. सुरूवातीला आघाडी घेणारे भाजपचे संजय केळकर पिछाडीवर गेलेत.

Updated: Jul 4, 2012, 06:00 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे सर्वाधिक मतांनीनी विजयी झाले आणि २० वर्षापासूनची भाजपा-सेनेची मक्तेदारी मोडून काढली. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. मुंबईत शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील विजयी झाले आहेत.

 

मनिषा कायंदे यांचा मोठ्या फरकाने त्‍यांनी पराभव केला आहे. कायंदे यांच्‍या बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपमध्‍ये तणाव निर्माण झाला होता. कपिल पाटील यांना ९७४९ मते मिळाली तर मनिषा कायंदे यांना केवळ ६३१ मते मिळाली. अपक्ष उमेदवार बाळासाहेब म्हात्रे यांना १५२९ मते मिळाली.

सर्वात धक्‍कादायक निकाल म्‍हणजे ठाण्‍यातून वसंत डावखरे यांचे चिरंजीव निरंजन यांचा विजय झाला आहे. भाजपचे संजय केळकर यांचा त्‍यांनी अटीतटीच्‍या लढतीत पराभव केला. दुपारी 12 वाजता मिळालेल्‍या अपडेटनुसार संजय केळकर हे फक्त 25 मतांनी आघाडीवर होते. परंतु, दुस-या टप्‍प्‍यानंतर डावखरेंनी आघाडी घेतली. भाजपसाठी हा फार मोठा धक्‍का आहे.

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातही राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी 4200 मतांची आघाडी घेतली होती. सुरूवातीला आघाडी घेणारे भाजपचे संजय केळकर पिछाडीवर गेलत.

 

याचबरोबर राष्ट्रवादीचे बंडखोर आणि मनसेनं पाठिंबा दिलेले निलेश चव्हाण यांना मतदारांनी सपशेल नाकारल्याचं चित्र पुढं आलंय. संजय केळकरांना गड राखण्याचं आव्हान असून भाजप नेते विनोद तावडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.  तरविधान परिषदेचे उपसभासती वसंत डावखरे यांनी आपले पुत्र निरंजन डावखरे यांच्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली.