सोन्याची पुन्हा भरारी!

जळगावच्या प्रसिध्द सराफ बाजारात शुक्रवारपर्यंत प्रतितोळा २९,८०० रूपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने शनिवारी अचानक ३०,४०० रूपयांचा उच्चांकी दर गाठला.

Updated: Jun 3, 2012, 08:58 AM IST

 www.24taas.com, जळगाव 

 

आंतरराष्ट्रीय बाजारातील अर्थकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवरही दिसून येतोय.

 

जळगावच्या प्रसिध्द सराफ बाजारात शुक्रवारपर्यंत प्रतितोळा २९,८००  रूपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने शनिवारी अचानक ३०,४००  रूपयांचा उच्चांकी दर गाठला. म्हणजेच एका रात्रीत सोन्याचा दर सरासरी ६०० रूपयांपर्यंत वधारल्याचं दिसून आलं.

 

जागतिक बाजारपेठेत सोन्याचा डॉलरमधला भाव १५५५ वरून अचानक १६२५  झाला. त्याचा परिणाम देशाच्या सराफ बाजारावर होऊन सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं सराफ व्यावसायिकांच म्हणणं आहे. या भाववाढीमुळे सोन्याच्या किरकोळ विक्रीवर नव्हे पण खरेदीवर परिणाम होईल, असं वाटत असताना बाजारात मात्र त्याउलट परिस्थिती दिसून आली. जळगावमध्ये सोनेखरेदीचा ग्राहकांचा उत्साह थोडादेखील कमी झालेला दिसून आला नाही.

 

.