www.24taas.com, मुंबई
कापसावरच्या निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. निर्यात बंदी उठवण्याचं सुतोवाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कालच केले होते. निर्यातबंदी उठवल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वाणिज्य मंत्रालयानं 6 मार्च रोजी कापूस निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळं कापूस उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली होती.
अनेक ठिकाणी आंदोलन झाली होती. राज्यात यंदा कापसाचं विक्रमी उत्पादन झालं असल्याने निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात वाव होता, मात्र सरकारने निर्यातबंदी केलेल्या शेतकरी हतबल झाला होता. निर्यातबंदीमुळे भाव खाली येण्याची भीती होती. त्यानंतर निर्यातबंदी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता सरकारने निर्यातबंदी उठवल्याने शेतकऱ्याला हायसे वाटले आहे.
कापूस निर्यात बंदी मागे घ्यावी या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रात यंदा कापसाचं उत्पादन मोठया प्रमाणात झालं आहे. निर्यातीवर बंदी घातल्यास कापसाचे भाव मोठया प्रमाणात घसरण्याची शक्यता निर्माण झाली होती.