आकाशला झाकणार 'मायक्रोमॅक्स टॅबलेट'?

आकाश टॅबलेटने गॅझेट मार्केटमध्ये बरीच उलथापालथ केली होती. पण आता आकाश टॅबलेटला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स सज्ज झाली आहे. मायक्रोमॅक्स कंपनीनेही आता आपलं टॅबलेट मार्केटमध्ये आणलं आहे.

Updated: Apr 8, 2012, 05:11 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आकाश टॅबलेटने गॅझेट मार्केटमध्ये बरीच उलथापालथ  केली होती. पण आता आकाश टॅबलेटला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स सज्ज झाली आहे. मायक्रोमॅक्स कंपनीनेही आता आपलं टॅबलेट मार्केटमध्ये आणलं आहे. या फनबुकची किंमत असणार आहे फक्त  ६,४९९ रू.

 

शैक्षणिक क्षेत्रात याचा जास्तीत जास्त उपयोगात येणारा असा हा टॅबलेट पीसी असणार आहे. तसचं भारतीय कंपनीनेच हे टॅबलेट बनवलं आहे. मायक्रोमॅक्स कंपनीचं  असं म्हणणं आहे की, 'जवळजवळ १ लाख  टॅबलेट हे प्रत्येक महिन्याभरात तयार होतील. आणि त्यात जास्तीत जास्त वाढ करण्याचा आमचा विचार  आहे'. तसचं ह्यात  आणखी काही उपयुक्त बदल  करता येतील का? हे देखील आम्ही पाहत आहोत . असं मायक्रोमॅक्स कंपनीचे सीईओ दीपक मल्होत्रा यांनी म्हंटल आहे.

 

कंपनीने मार्केटींगमध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाही असं सीईओ  दीपक याचं म्हणणं आहे. मायक्रोमॅक्स  अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गुंतवणूक या टॅबलेटसाठी केली आहे. मायक्रोमॅक्सचं हे फनबुक सात  इंच  असणार आहे, तसचं यात अॅनरॉईड 4.0. 3 सॉफ्टवेअर हे देखील सपोर्ट करेल. तसचं 1.22 GHz त्याचा प्रोसेसर  असेल तर  0.3VGA  इतकी क्षमता पुढील कॅमेऱ्याची असणार आहे.  तसचं 4 GB इतकी मेमरी असणार आहे.  तर जास्तीत जास्त  32 GB इतकी त्याची क्षमता असणार आहे.

 

कंपनीचं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक  अभ्यासक्रमासाठी याचा उपयोग  होणार आहे. तसचं उपयुक्त असा डेटा देखील त्यात मिळणार आहे. ग्राहकाला फक्त ७९९ रूपये देऊन  देखील  हा टॅबलेट घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. विद्यार्थी हा टॅबलेट  फक्त ७९९ रूपयात देखील मिळवू शकता... त्यामुळे आता आकाश  टॅबलेटला मायक्रोमॅक्स कुठवर  टक्कर देणार  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.