www.24taas.com, हेलसिंकी
आपल्या मोबाइलमध्ये वेगवेगळ्या फोटोंचं कलेक्शन असतं, सिनेमांचं कलेक्शन असतं. हे आपण मोबाइलमध्ये पाहातच असतो. कधी काँप्युटरला जोडून मोठ्या स्क्रीनवर पाहातो. पण फिनीश तंत्रज्ञांनी नवं तंत्र विकसित केलं आहे. यात मोबाईलमध्येच प्रोजेक्टर आहे. ज्यामुळे कुठल्याही भिंतीवर आपण मोबाइलमधील फोटो, व्हिडिओ मोठ्या साईजमध्ये पाहू शकतो. यात फोटो मोठ्या साइजमध्ये केल्यावरही ते पिक्सलेट होत नाही. स्पषट आणि व्यवस्थित दिसतात. स्लाईड शोच्या रुपातही हे आपण पाहू शकतो. याशिवाय गेम्सही आपण प्रोजेकटरवरून मोठ्या स्क्रीनवर खेळू शकतो.
१ ते २ सेंटीमीटरच्या या छोट्याशा प्रोजेक्टरमध्ये डिजीटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, गेमिंग डिव्हाइसेस यांसारखी वेगवेगळी विद्युत उपकरणं बसवण्यात आली आहेत. या मोबाइलमधून हाय क्वालिटी इमेजेस, व्हिडिओ पाहाता येतात. असा प्रोजेक्टर बनवणं खूप कठीण काम होतं. त्यातूनही त्यातील रंगसंगती योग्य राखणं अत्यंत क्लिष्ट काम होतं. आणि त्याहूनही मोठं आव्हान होतं ते या मोबाइलची किंमत बजेटमध्ये राहावी म्हणून कमीत कमी खर्चात हे तंत्रज्ञान विकसित करणं. अनेक चर्चा, सेशन्स, प्रयोग केल्यानंतर अखेर असा प्रोजेक्टर असणारा मोबाइल तयार करण्यात यश आलं आहे.
सध्याच्या काळात अशा प्रकारचा मोबाइल कुठल्याच कंपनी बनवला गेलेला नाही. पण, लवकरच या प्रकारचे मोबाइल्स बाजारात उपलब्ध होतील. तेव्हा मोबाइल्सवरील गेम्स, क्लिप्स, गेम्स मोठ्या पडद्यावर अनुभवाला तयार राहा.