तुमचा मोबाईल आता हॅक होणार...

तुमचा मोबाईल अँड्रॉइड आहे का? असा प्रश्न सरार्स विचारला जातो.. काय आहे नक्की ही अँड्रॉइड सिस्टिम..?? मोबाइल हँडसेटमधील ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अँड्रॉइड ही सिस्टिम प्रसिद्ध झाली आहे .

Updated: Jul 10, 2012, 10:28 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

तुमचा मोबाईल अँड्रॉइड आहे का? असा प्रश्न सरार्स विचारला जातो.. काय आहे नक्की ही अँड्रॉइड सिस्टिम..?? मोबाइल हँडसेटमधील ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अँड्रॉइड ही सिस्टिम प्रसिद्ध झाली आहे . गुगल कंपनीची अनेक अॅप्लिकेशन ( अॅप्स ) यावर उपलब्ध असल्याने आणि त्याचप्रमाणे ही वापरण्यास सोपी असल्याने अनेक कंपन्यांनी या सिस्टिमवर आधारित अॅप डेव्हलप केली आहेत.

 

पण या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित मोबाइल फोनचे वाढते प्रमाण पाहता सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत कम्प्युटरमार्फत सायबर गुन्हे करणारे या नव्या माध्यमाचा वापर करण्याचा अधिक विचार करू लागले आहे . अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम अशा प्रकारचे अॅटॅक होऊ शकतात , असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

अँटीव्हायरस क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिमँटेक या कंपनीचेदेखील म्हणणे आहे. तरुणांमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण वाढत आहे . सोशल नेटवर्किंग , नेट सर्फिंगही मोबाइलवरून करण्यास अनेकजण प्राधान्य देत आहे . वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने कम्प्युटरऐवजी मोबाइलवरून सायबर अॅटक होऊ शकतो आणि त्याचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे अँड्रॉइड मोबाईल घेताना जरा विचार करूनच घ्या.