फ्रेंडशीप, जरा जपूनच !

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करताना जरा जपून करा. कारण त्या माध्यमातून सायबर अ‍ॅटॅक होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ट्रोजनचा वापर करून अशाप्रकारचे सायबर अ‍ॅटॅक केले जात असल्याचे एका आयटी कंपनीने नुकतेच स्पष्ट केले.

Updated: Oct 21, 2011, 10:54 AM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करताना जरा जपून करा. कारण त्या माध्यमातून सायबर अ‍ॅटॅक होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ट्रोजनचा वापर करून अशाप्रकारचे सायबर अ‍ॅटॅक केले जात असल्याचे सायबरोम या आयटी कंपनीने नुकतेच स्पष्ट केले.

 

घोटाळेबहाद्दर या माध्यमातून आपली सर्व माहिती मिळवत असतात. युजर्सच्या फेसबुक वापरासंदर्भात केलेल्या एका सवेर्क्षणानुसार बहुतांश लोक फ्रेण्ड रिक्वेस्ट त्या व्यक्तीची माहिती न घेता अ‍ॅक्सेप्ट करतात. यामुळे घोटाळेबहाद्दरांचे फावते आणि ते स्पॅम मेसेच्या साहय्याने आपल्या अकाऊंटचे आणि माहितीचे मॉनिटर करत असतात. आपल्या माहितीचा दुरुपयोग करतात.

 

सायबरोमने कॉमट नावाच्या कंपनीच्या सहकार्याने हा अभ्यास पूर्ण केला. ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या अशाप्रकारच्या हल्ल्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर माहितीची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. याचबरोबर फेसबुकवर येणाऱ्या विविध ऑफर्सच्या माध्यमातूनही एका व्यक्तीच्या फ्रेण्डलिस्टमधील फ्रेण्डसमध्ये स्पॅम पसरवला जातो. फेसबुकवरील विविध पेजेसच्या 'लाइक' बटनवर क्लिक केले तरी स्पॅम पसरत असल्याचे सायबरोमने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

 

यामुळे हॅकर्सनी आता सोशल नेटवर्किग साइटवरून लोकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोशल नेटवर्किग साइट्सवर फ्रेण्ड रिक्वेस्ट अॅक्स्पेट करताना विचार करणे भाग पडणार आहे. हॅकर्ससाठी सोशल नेटवर्किंग साइट्सचे हत्यार सोपे झाले असून यामुळे भविष्यात अधिकाधिक सायबर हल्ले होऊ शकतील असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.