मोबाईलवर बोलणं आता होणार महाग...

जगातली सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ असलेल्या भारतातल्या ग्राहकांचे मोबाईलवर बोलणं आता महागण्याची शक्यता आहे. टू जी स्पेक्ट्रमचा पुन्हा लिलाव घेण्यात य़ेणार आहे. त्यामुळे आता मोबाईलवर बोलणं, हे महागात पडणार आहे.

Updated: Apr 24, 2012, 12:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

जगातली सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ असलेल्या भारतातल्या ग्राहकांचे मोबाईलवर बोलणं आता महागण्याची शक्यता आहे. टू जी स्पेक्ट्रमचा पुन्हा लिलाव घेण्यात य़ेणार आहे. त्यामुळे आता मोबाईलवर बोलणं, हे महागात पडणार आहे.

या लिलावासाठीच्या किमान किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शिफारस ट्रायनं केली आहे. असं झालं तर मोबाईल कंपन्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. साहजिकच हा पैसा ग्राहकांच्याच खिशातून वसूल करण्यासाठी मोबाईल कंपन्या मोठ्या प्रमाणात कॉल रेटमध्ये भाववाढ करण्याची शक्यता आहे.

ट्रायनं लिलावाची जी किमान किंमत ठरवली आहे. ती किंमत थ्री जीच्या लिलावात मिळालेल्या किंमतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळं या शिफारशीचा स्वीकार केला तर मोबाईल कॉल रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर ही वाढ झाली तर त्यांचा भार मात्र ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.