कँसरपासून वाचवतो बहुगुणी 'ग्रीन टी'

‘ग्रीन टी’चे नवनवे फायदे अजूनही दिसत आहेत. एखा नव्या अभ्यासानुसार ग्रीन टीमुळे कँसर तसेच श्वसनविकारांपासून बचाव होतो. ग्रीन टीमधील ऑक्सिकरण विरोधी पॉलिफिनॉल दात आणि श्वासाच्या समस्या निर्माण करणाऱ्या तत्वांपासून रक्षण करतात.

Updated: Mar 20, 2012, 11:21 AM IST

www.24taas.com, लंडन

 

‘ग्रीन टी’चे नवनवे फायदे अजूनही दिसत आहेत. एका नव्या अभ्यासानुसार ग्रीन टीमुळे कँसर तसेच श्वसनविकारांपासून बचाव होतो.

 

इस्त्राइल प्रौद्गिकी संस्थेच्या एका ग्रुपने केलेल्या संशोधनातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. त्यातून असे समोर आले आहे की ग्रीन टीमधील ऑक्सिकरण विरोधी पॉलिफिनॉल दात आणि श्वासाच्या समस्या निर्माण करणाऱ्या तत्वांपासून रक्षण करतात. याशिवाय तोंडाच्या कँसरपासूनही वाचवायचं काम ग्रीन टी करतो.

 

डेली मेलच्या वृत्तानुसार ग्रीन टीचा समावेश सुपरफूडमध्ये करण्यात आला आहे. ग्रीन टीमुळे हृदयविकार आणि अल्झायमरसारखे आजार होत नाहीत असं यापूर्वीच सिद्ध झालं आहे. पण, श्वासाचे विकार, कँसर यांसरख्या आजारांवरही ग्रीन टी प्रभावी ठरतो. याशिवाय मन आणि बुद्धीचा थकवा मिटवण्यासाठी ग्रीन टीचं सेवन हे नेहमीच केलं जातं. असा हा ग्रीन टी अत्यंत उपयोगी आहे.