वयात होते वाढ, तशी झोप लागते गाढ

आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की जसजसं माणसाचं वय वाढतं, तसतशी त्याची भूक, झोप कमी होते. पण, नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे की वाढत्या वयानुसार झोपही वाढू लागते आणि अधिक शांत झोप लागते.

Updated: Mar 2, 2012, 04:39 PM IST

www.24taas.com, लंडन

आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की जसजसं माणसाचं वय वाढतं,  तसतशी त्याची भूक, झोप कमी होते. पण, नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे की वाढत्या वयानुसार झोपही वाढू लागते आणि अधिक शांत झोप लागते.

पेन्सिलव्हानिया युनिव्हर्सिटीच्या एका ग्रुपने १ लाख ५० हजार वयस्कर लोकांशी फोनवर संवाद साधून सर्व्हे केला. या सर्वेक्षणातून असं सिद्ध झालंय की वयाच्या चाळिशीनंतर बहुतेक लोकांची झोप वाढते. आणि अधिक गाढ झोप लागते.

स्लीप जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात सांगतलं गेलंय की वय वर्षं ८० पार केलेल्या लोकांनी मान्य केलं की त्यांना सगळ्यात चांगली झोप या वयात लागत आहे.