सतत गोड खाल्ल्याने सुस्तावतो मेंदू

केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणं कमी करा. कारण, या पदार्थांमुळे आपल्या शिकण्या-समजण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. कॅलिफोर्निया यूनुव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करून हा निष्कर्ष काढला आहे.

Updated: May 18, 2012, 11:18 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणं कमी करा. कारण, या पदार्थांमुळे आपल्या शिकण्या-समजण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. कॅलिफोर्निया यूनुव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करून हा निष्कर्ष काढला आहे.

केक, कुकी, जेली, जॅम आणि शीत पेयं यांसारक्या पदार्थांचं अतिसेवन केल्यास जेमतेम ६ आठवड्यांत वेडसर दिसायला लागतो. यावर संशोधन करणाऱ्या गोमेज पिनाला म्हणाले, “आमच्या अभ्यासातून लक्षात येतंय की आपण जे खातो, तसेच आपले विचार बनतात.”

‘लाईव्ह सायंस’ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात लिहिलं आहे की सतत गोड खाल्ल्याने मेंदू सुस्तावतो आणि त्याची स्मरणशक्ती कमी होत जाते. यावर उपाय म्हणजे आमेगा-३ फॅटी ऍसिड असणारं अन्न जेवल्यास हा धोका कमी होतो.