हॉकीच्या जादुगाराला भारतरत्न देण्याची विनंती

सरकारने भारतरत्न देण्याच्या नियमांमध्ये बदल केल्याने आता खेळाडूंना हा सर्वोच्च नागरी सन्मान देता येणार आहे. हॉकी इंडियाने बुधवारी सरकारला क्रिडा मंत्रालयाला मेजर ध्यानचंद यांना हा किताब देण्याची विनंती केली आहे.

Updated: Dec 21, 2011, 02:46 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

सरकारने भारतरत्न देण्याच्या नियमांमध्ये बदल केल्याने आता खेळाडूंना हा सर्वोच्च नागरी सन्मान देता  येणार आहे. हॉकी इंडियाने बुधवारी सरकारला क्रिडा मंत्रालयाला मेजर ध्यानचंद यांना हा किताब देण्याची  विनंती केली आहे. क्रिडा मंत्री अजय माकन यांना लिहिलेल्या पत्रात भारतीय हॉकीला दिलेल्या असाधारण  योगदानाबद्दल ध्यानचंद यांना हा पुरस्कार देण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

ध्यानचंद हे ऑल टाईम ग्रेट हॉकीपट्टू होते आणि जीवंतपणी ते आख्यायिका बनले. ध्यानचंद यांची हॉकीतली कामगिरी अजोड अशीच आहे. ध्यानचंद यांनी दोन दशकातल्या आपल्या कारकिर्दीत १००० आंतरराष्ट्रीय गोल्स नोंदवण्याच पराक्रम गाजवला होता. ध्यानचंद यांनी ऍमस्टरडॅम १९२८, लॉस एंजेलिस १९३२ आणि बर्लिन १९३६ ऑलिंपीकमध्ये सलग तीन वेळा सुवर्ण पदकं पटकावली होती. ध्यानचंद पहिले भारतीय खेळाडू होते ज्यांना १९५६ साली पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं