आश्विनचे ‘प्रिती’संगम

भारताचा स्पिनर रवीचंद्रन आश्विन आणि त्याची लहानपणीची सखी तसंच शाळेतील वर्गमैत्रिण प्रिती नारायण यांचा विवाहसोहळा एक अत्यंत साध्य समारंभात पार पडला.

Updated: Nov 13, 2011, 03:11 PM IST

झी २४ तास वेब टीम

 

भारताचा स्पिनर रवीचंद्रन आश्विन आणि त्याची लहानपणीची सखी तसंच शाळेतील वर्गमैत्रिण प्रिती नारायण  यांचा विवाहसोहळा एक अत्यंत साध्य समारंभात पार पडला. आश्विनचे तमिळ नाडू संघातील संवगडी, मित्र आणि नातेवाईक मंडळी स्वागतसमारंभाला उपस्थित होती. नवविवाहीत जोडपं कोलकात्याला रवाना होणार आहेत.

 

कोलकात्यात सोमवारी सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसऱ्या कसोटीत आश्विन खेळणार आहे. मागच्या आठवड्यात दिल्लीच्या फिरोझ शाह कोटली स्टेडियमवर आश्विनने पदार्पणातच नऊ विकेट घेत कसोटी सामना गाजवला. कसोटी सामन्यातले दमदार पदार्पण आणि विवाह यामुळे हा आठवडा आश्विनच्या आयुष्यातील संस्मरणीय ठरेल यात काहीच शंका नाही.