ऑस्ट्रेलियन मीडियाचा सचिन विरोधात कट!

ऑस्ट्रेलियन मीडियाने आत सचिन विरोधात माइंड गेम खेळायला सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियातला प्रमुख वृत्तपत्र ‘हेरॉल्ड सन’नं मंकीगेट प्रकरणात सचिन खोटं बोलला होता असा आरोप पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टरला टार्गेट केले आहे.

Updated: Jan 2, 2012, 05:54 PM IST

24taas.com, सिडनी

ऑस्ट्रेलियन मीडियाने आत सचिन विरोधात माइंड गेम खेळायला सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियातला प्रमुख वृत्तपत्र ‘हेरॉल्ड सन’नं मंकीगेट प्रकरणात सचिन खोटं बोलला होता असा आरोप पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टरला टार्गेट केले आहे.

 

सीरिजमधील पहिल्या मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर ऑसी मीडियानं आता मंकीगेट प्रकरण उकरून काढले आहे. सचिननं आज सिडनीमध्ये ऐतिहासिक कामगिरी कऱण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र इथंच क्रिकेटला कलंकित करणारी घटना घडली असल्याचा आरोप या वृत्तपत्रानं केलाय.

 

2008मध्ये मंकीगेट प्रकरणी सचिननं हरभजनसिंगची बाजू घेतल्यानं त्याची ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्याबद्दलचा आदर कमी झाल्याचंही ऑस्ट्रेलियन मीडियानं म्हटलंय...महत्वाचं म्हणजे सचिन तेंडुलकरता सिडनी गाऊंडवरील आतापर्यतचा परफॉमन्स जबरदस्त झालाय. त्यामुळे महासेंच्युरीपासून रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन मीडियाने सचिनविरुद्ध हा माईंड गेम सुरु केला आहे.

 

सिडनीतील हा सामना सचिनसाठी सर्वोत्तम ठरेलही, मात्र हे मैदान सचिनच्या एका लाजिरवाणा कृत्याचंही साक्षीदार आहे. अँण्ड्र्यू सायमंण्डसच्या मंकीगेट प्रकरणात सचिन तेंडुलकरच्या भूमिकेला ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अजूनही माफ केलेलं नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम सचिननला त्याचा शंभराव्या शतकाचा माईलस्टोन इथे कधीही गाठू देणार नाहीत.

 

साल २००८च्या दौऱ्यात याच मैदानात पार पडेलेल्या त्या कसोटीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक काळा इतिहास आहे. ऑस्ट्रेलियाच्या अँण्ड्र्यू सायमंण्ड्सवर वंशभेदी टिप्पणी केल्याबद्दल हरभजनसिंगवर खटला भरण्यात आला होता. भारतातर्फे कर्णधार अनिल कुंबळे ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्यासह दोन्ही संघातील त्या घटनेच्यावेळी आसपास उपस्थित खेळाडूंच्या साक्षी त्यावेळी नोंदवण्यात आल्या होत्या. ज्यात हरभजसिंगसोबत त्यावेळी मैदानात नॉनस्ट्राईक एण्डवर उभ्या असलेल्या सचिन तेंडुलकरची साक्ष फार महत्त्वाची होती.

 

सिडनी हे सचिननचं परदेशातील आवडत्या मैदानांपैकी एक स्टेडियम. सचिनने इथे नेहमीच खोऱ्याने धावा कढल्या आहेत. इथे खेळलेल्या चार कसोटीत नाबाद १४८, ४५, ४, नाबाद २४१, नाबाद ६०, नाबाद १५४ आणि १२ अशा सात इनिंग साकारल्या आहेत. त्यामुळे सचिनला टार्गेट करून टीम इंडियाचं मनोबल खच्ची करण्याचा ऑस्ट्रेलियन मीडियाचा डाव असल्याचे समोर येत आहे.

 

 

[jwplayer mediaid="22401"]