www.24taas.com, सिडनी
सिडनीत टीम इंडियाच्या आघाडीच्या बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली असताना ऑस्ट्रेलियाने आपली पडझड सावरत चांगली सुरूवात केली आहे. केवळ तीन विकेट गमावून २३६ रन्स केल्या आहेत.
पहिल्या दिवसात बॉलरसनी कमाल केली. परंतु ऑस्ट्रेलिया संघातील बॅट्समनी चांगली कामगिरी करताना २३६ रन्स केल्या आहेत. मायकेलने शतक करताना १०३ तर रिकी पॉंटींग शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तो ९७ धावांवर खेळत आहे.
मेलबर्न टेस्टमध्ये बॅट्समनच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला होता आणि सिडनी टेस्टमध्येही परिस्थिती फारशी वेगळी दिसली नाही. बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली आणि टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडली आहे.
मेलबर्न टेस्टमध्ये याच बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळे भारताला लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला होता. विजयाची संधी असूनही बॅट्समनच्या हाराकिरीमुळे भारतानं मेलबर्न टेस्ट गमावली. आणि सिडनी टेस्टमध्येही तेच चित्र दिसून आलं. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरचा अपवाद वगळता एकाही बॅट्समननी पिचवर उभं राहण्याचा प्रयत्न केला नाही.
ऑस्ट्रेलिया 236/3 (53.0 ov)
टीम इंडिया (पहिला डाव) - 191