कोण होणार आयपीएलमधील मोठा हिटर?

टी-20 महासंग्रामात विजय हा बॅट्समनचाच होतो. प्रत्येक टीमची भिस्त ही टीमला विजय मिळवून देणा-य़ा चेह-यांवर असते. असे बॅट्समन जे वारंवार बॉल बाऊंड्रीच्या पार पाठवतील. आयपीएलमध्ये ख्रिस गेल पासून ते विराट कोहलीमध्ये सगळ्यात मोठा हिटर कोण ही स्पर्धा लागणार आहे.

Updated: Apr 5, 2012, 07:51 PM IST

www.24taas.com, वृषाली देशपांडे, मुंबई

टी-20 महासंग्रामात विजय हा बॅट्समनचाच होतो. प्रत्येक टीमची भिस्त ही टीमला विजय मिळवून देणा-य़ा चेह-यांवर असते. असे बॅट्समन जे वारंवार बॉल बाऊंड्रीच्या पार पाठवतील. आयपीएलमध्ये ख्रिस गेल पासून ते विराट कोहलीमध्ये सगळ्यात मोठा हिटर कोण ही स्पर्धा लागणार आहे.

 

 

पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पहायला मिळणार फोर सिक्सची बरसात...आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये हार्ड हिटर बॅट्समनमधील स्पर्धा पुन्हा रंगणार आहे. ज्या टीममध्ये आक्रमक बॅट्समन अधिक असतील त्या टीमला टूर्नामेंटमध्ये वर्चस्व राखण्याची नामी संधी असणार....बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा ख्रिस गेल हा या टूर्नामेंटचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असणार....गेलमध्ये आपल्या टीमला एकहाती मॅच जिंकून क्षमता आहे.

 

त्याच्या स्फोटक बॅटिंगसमोर प्रतिस्पर्धी बॉलर्स अक्षरक्ष: नतमस्तक होतात. त्यामुळे गेलपासून इतर टीम्सना सावध राहवच लागणार आहे. गेलप्रमाणेच त्याचा विंडिज टीममधील साथीदार कायरन पोलार्ड या सीझनमध्ये सगळ्यात मोठा हार्ड हिटर ठरु शकतो. मुंबई इंडियन्सचा तो हुकमी एक्का आहे. त्यानं आपल्या बॅटिंगचा तडाखा प्रतिस्पर्ध्यांना अनेकदा दिला आहे. त्यामुळे या सीझनमध्ये मुंबईला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नर दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

 

 

सेहवागनं वन-डेमध्ये डबल सेंच्युरीही झळकावली आहे. त्यामुळे इतर टीमसाठी तो चांगलाच धोकादायक ठरणार आहे. तर डेव्हिड वॉर्नरचा धडाका सा-यांनी टेस्ट, वन-डे आणि टी-20 पाहिला आहे. आपीएलमध्ये त्याच्या टीमसाठी तो नेहमीच की-फॅक्टर ठरत आला आहे. सचिन तेंडुलकर हा ऑल टाईम ग्रेट बॅट्समन नेहमीच प्रतिस्पर्ध्यांसाठी चिंतेची बाब ठरतो. कुठल्याही क्षणी सचिनची बॅट तळपते आणि तो आपल्या टीमला मॅच जिंकून देतो.

 

 

सचिनप्रमाणे सध्या तुफान फॉर्मात असलेला विराट कोहलीकडेही सा-यांचच लक्ष असेल. कोहली नेहमी परिस्थितीनुसार आपल्य़ा बॅटिंगमध्ये बदल करतो. त्याच्या बॅटिंगच हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्याच्यापासून सावध रहाव लागणार आहे. तर मुंबई इंडियन्सच्या रिचर्ड लेव्हीनं आपल्या तुफान फटेकबाजीनं पहिल्याच मॅचमध्ये मुंबईला विजयश्री मिळवून दिली. त्यामुळे लेव्हीनही या हार्ड हिटरर्सच्या रेसमध्ये आपणही असल्याचं दाखवून दिलं आहे. आता या हार्ड हिटरर्सच्या रेसमध्ये कोण बाजी मारतो ? याकडेच चाहत्यांच लक्ष असणार आहे.