टीम इंडियाचे वस्त्रहरण.

इंग्लंडमधील टीम इंडियाच्या कामगिरीच वर्णन करण्यासाठी केवळ एकच शब्द पुरेसा आहे. तो म्हणजे मानहानीकारकपणा.. टेस्टमध्ये व्हाईट वॉश मिळाल्यानंतर आता वनडे सीरीजही टीम इंडियाच्या हातून गेली आहे. लॉर्डसवर चौथी वनडे टाय झाली आणि भारतच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या निराशाजनक, अपयश, सुमार कामगिरी हा..

Updated: Oct 9, 2011, 02:12 PM IST

झी २४ तास वेब टीम, लॉर्ड्स

 

[caption id="attachment_467" align="alignleft" width="301" caption="चौथी वन-डे टाय, सीरीजही गमावली"][/caption]

इंग्लंडमधील टीम इंडियाच्या कामगिरीच वर्णन करण्यासाठी केवळ एकच शब्द पुरेसा आहे.  तो म्हणजे मानहानीकारकपणा.. टेस्टमध्ये व्हाईट वॉश मिळाल्यानंतर आता वनडे सीरीजही टीम इंडियाच्या हातून  गेली आहे.  लॉर्डसवर चौथी वनडे  टाय  झाली आणि  भारतच्या  उरल्या सुरल्या आशाही  संपुष्टात आल्या  निराशाजनक, अपयश, सुमार कामगिरी हा..  असाच एकूण भारताचा इंग्लंड दौरा म्हणावा लागेल.  या दौ-यांत भारताने काय कमावलं हा प्रश्नच येत नाही,  कारण की कमवाण्यापेक्षा काय गमावलं यांचीच यादी तयार करावी लागेल.  संपूर्ण इंग्लंड दौरा हा 'टीम इंडीयाचे वस्त्रहरण' करणारा ठरला  आहे.  काल  झालेल्या  मॅचमुळे हे नक्कीच सिध्द झालयं.

 

लॉर्डसवर झालेल्या चौथ्या वनडे मॅच मध्ये खरं तर मॅचची सुरवात टीम इंडीयाच्या अपेक्षेप्रमाणे झाली होती अंजिक्य रहाणे आणि पार्थिव पटेलनं चांगली सुरवात करून दिली,  तर कोहली आणि  द्रविड  झटपट आऊट झाले.  तरीही रैना आणि धोनी डगमगले नाहीत.  या  दोघांनी पाचव्या विकेटसाठी 169  रन्सची पार्टनरशिप केली. त्यामुळे 280 पर्यंत टीम इंडीयाला मजल मारता आली.  बॅटसमनच्या या प्रयत्नांना बॉलर्सची साथ मिळू शकली नाही. इंग्लंडचे ओपनर्स झटपट आऊट झाले.  मात्र बेल आणि बोपारानं चांगलंच सतावलं.

 

इंडियन बोलर्सच्या स्वैर  बॉलिंगला गलथान  फिल्डिंगचीही पूरेपूर  साथ मिळाली.  बॅट्समनच्या मेहनतीवर बॉलर्सनी पाणी फिरवलं.. शेवटच्या क्षणी प्रतिकार केला खरा..  मुनाफच्या एका ओव्हरमध्ये दोन इंग्लिश बॅट्समन आऊट झाले याच क्षणी आलेल्या पावसात निर्णायक विजयाचं स्वप्न वाहून गेलं रविवारी झालेली मॅच बरोबरीत सुटली मात्र टीम इंडियाच्या फॅन्ससाठी हा एक पराभवच आहे.  टेस्टमध्ये व्हाईट वॉश मिळाला किमान वन-डेमध्ये तरी  लाज  वाचेल अशी क्रिकेट प्रेमींची ही अपेक्षा सुध्दा फोल ठरलीय काही दिवसांपूर्वीच ही टीम इंडिया टेस्टमध्ये अव्वल तर वन-डेची वर्ल्डचॅम्पियन टीम होती.  असं कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही.

 

'विजयाचा शोधात'

Tags: