ती महिला मला खेटत होती- सिद्धार्थ मल्ल्या

आयपीएलमध्ये सध्या फारच वाईट गोष्टी घडत आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पार्टीत ल्यूक पॉमर्सबॅचने महिलेची काढलेली छेड आणि त्यानंतर झालेली अटक यामुळे हा विषय चांगलाच गाजत आहे.

Updated: May 18, 2012, 06:41 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

आयपीएलमध्ये सध्या फारच वाईट गोष्टी घडत आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पार्टीत ल्यूक पॉमर्सबॅचने महिलेची काढलेली छेड आणि त्यानंतर झालेली अटक यामुळे हा विषय चांगलाच गाजत आहे. रॉयल चॅलेंजर्सचा ओनर विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्याने आरोप केला आहे की, आरोप करणाऱ्या महिलेच्या चारित्र्य़ावर संशय घेतला आहे.

 

सिद्धार्थने टि्वटरवर टि्वट केल आहे की, जी मुलगी ल्यूकवर आरोप करते आहे की, माझ्या बॉयफ्रेंडला मारहाण केली, हे सगळे आरोप खोटे आहेत. काल रात्री ती मला जरा जास्तच चिपकत होती, जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होती, आणि माझ्याकडे माझा बीबीएम पिन सुद्धा मागत होती. जर तो तिचा होणारा नवरा असता तर तिचं वागणं एखाद्या नवरी सारखं अजिबात नव्हतं.

 

याआधी आयपीएलच्या खेळाडू ल्यूक पॉमर्सबॅचवर छेडछाड आणि मारामारीचा आरोप करणारी पिडीत महिलाने सांगितलं की, ज्यावेळेस पॉमर्सबॅच आणि त्याचे काही मित्र हे दारू पिण्यासाठी आमच्यासोबत सामिल झाले होते. महिलेने सांगितले की आम्ही एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्यामुळे ड्रिंक घेण्यासाठी आमच्या मित्रांसोबत खाली गेलो होतो. तर तेव्हा पॉमर्सबॅचने माझ्या बॉयफ्रेंडला सांगितलं की, तो पण त्यांच्यासोबत ड्रिंक घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे आम्ही त्याला नाही म्हणू शकलो नाही.