www.24taas.com, मुंबई
राहुल सारखा दुसरा क्रिकेटर होणार नाही आणि मला त्याची उणीव भासेल, अशा भावना द वॉल राहुल द्रविड क्रिकेटला निरोप देतोय ही बातमी समजताच मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राहुल द्रविड हा एकमेवाद्वितीय आहे. त्याच्यासारखा तोच आहे. मी राहुल द्रविडची उणीव ड्रेसिंग रूममध्ये जाणवेल. राहुल द्रविड उद्या बंगळुरू येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. गेल्या १५ वर्षात राहुल द्रविड अडचणीच्या क्षणी वॉल सारखा उभा राहून टीम इंडियाला वाचविले आहे. सचिननंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये राहुल द्रविडचा दुसरा क्रमांक लागतो.
राहुल द्रविडसह मी खूप चांगले क्षण घालविले आहेत, आमच्या अनेक शतकी भागीदाऱ्या आम्ही मैदानात घालविलेल्या सुंदर क्षणाच्या साक्षीदार आहेत, असेही तेंडुलकरने सांगितले.
ज्या व्यक्तीने १६४ सामने खेळून १३००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत, त्या कोणतीही सलामी अपुरी पडणारी असल्याचेही तेंडुलकरने यावेळी सांगितले.