बॉक्सिंग-डे टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 277 रन्स केले. पीटर सीडल 34 रन्सवर आणि ब्रॅड हॅडिन 21 रन्सवर नॉटआऊट आहेत. टीम इंडियाच्या फास्ट मॅचच्या पहिल्या दिवशी बॉलर्सचं वर्चस्व राहिलं. उमेश यादव आणि झहीर खाननं कांगारु बॅट्समनना चांगलाच दणका दिला. मायकल क्लार्क आणि माईक हसीची विकेट झहीरनं घेतली. तर धोकादायक एड कोवेनचा अडसर आर. अश्विननं दूर केला.
सुरूवातीला टॉस जिंकून बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियाला उमेश यादव सुरुवातीलच 2 धक्के दिले. मार्श आणि वार्नर 46 रन्सवर आऊट झालेत..दोन विकेट्स झटपट गेल्यानंतर पॉन्टिंग आणि कोवेननं तिस-या विकेटसाठी 113 रन्सची पार्टनरशिप केली.
मात्र, पॉन्टिंग आऊट झाल्यावर कांगारुंची मिडल ऑर्डर चांगलीच कोसळली. पॉन्टिंग 62 रन्सवर तर एड कोवेन 68 रन्सवर आऊट झाला. भारताकडून उमेश यादवनं तीन, झहीर खाननं दोन आणि आर. अश्विननं एक विकेट घेतली. आता टेस्टच्या दुस-या दिवशी कांगारुंना झटपट आऊट करण्याच आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.
[jwplayer mediaid="18843"]