बंगळुरूने केला मुंबईचा पराभव

सलामीवीर ख्रिस गेलच्या तडाखेबाज नाबाद ८२ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने मुंबईचा ९ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला. सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा कायम ठेवल्या.

Updated: May 10, 2012, 12:16 AM IST

www.24taas.com, मुंबई 

 

सलामीवीर ख्रिस गेलच्या तडाखेबाज नाबाद ८२ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने मुंबईचा ९ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला. सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा कायम ठेवल्या. यंदाच्या मोसमातील अतिशय महत्त्वाची व प्लेऑफची दिशा ठरविणा-या सामन्यात मुंबईने १४२ धावांचे माफक आव्हान दिले होते.

 

त्याला प्रत्त्युत्तर देताना बंगळुरुने सुवातीला सावध खेळ करीत गेल व दिलशाने ८ षटकात ४८ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर दिलशान १९ धावांवर ओझाच्या गोलंदाजीवर पायचित झाला. मात्र त्यानंतर गेलने डावाची सुत्रे आपल्या घेत चौकार व षटकारांचा पाऊस पुन्हा एकदा पाडला. त्याला कर्णधार विराट कोहलीने उत्तम साथ दिली. कोहलीने २५ चेंडूत दोन षटकार व एका चौकारासह नाबाद ३६ धावा केल्या. त्यामुळे बंगळुरुने १८ षटकात १ गड्याच्या मोबदल्यात १४२ धावा करीत महत्त्वपूर्ण सामना खिशात घातला.

 

आजच्या सामन्यात मुंबईने अतिशय खराब सुरुवात केली असून त्यांनी दुस-याच षटकात दोन फलंदाज गमावले आहेत. जेम्स फ्रॅकलिनने १ आणि रोहित शर्माने तर ० धावा केल्या होत्या.  फ्रॅकलिनला त्याने झहीर खानकडे झेल देण्यास भाग पा़डले. तर रोहित शर्माला त्याने पायचित पकडले. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.