भविष्यवेत्त्याच्या मते सचिन का नंबर आयेगा...

सचिन तेंडूलकरच्या शंभराव्या शतकाची प्रतिक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे आणि तो स्वत:ही शतकांची सेंच्युरी कधी प्रत्यक्षात उतरेल याबाबत साशंक आहे. पण केरळचे प्रख्यात न्युमेरोलॉजिस्ट एम.के.दामोदरन यांना मात्र लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर परत एकदा फूलफॉर्ममध्ये येईल याची खात्री वाटत आहे.

Updated: Feb 28, 2012, 05:50 PM IST

www.24taas.com, त्रिवेंद्रम


सचिन तेंडूलकरच्या शंभराव्या शतकाची प्रतिक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे आणि तो स्वत:ही शतकांची सेंच्युरी कधी प्रत्यक्षात उतरेल याबाबत साशंक आहे. पण केरळचे प्रख्यात न्युमेरोलॉजिस्ट एम.के.दामोदरन यांना मात्र लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर परत एकदा फूलफॉर्ममध्ये येईल याची खात्री वाटत आहे. दामोदर यांच्या मते २४ एप्रिल रोजी सचिन ३९ वर्षात पदार्पण करेल आणि त्यानंतर परत एकदा त्याची फलंदाजी बहरेल. सचिनचा भाग्यांक ३ आहे आणि वयाच्या ३९ ची बेरिज ३+९=१२, १+२=३ अशी होईल तेव्हा परत एकदा त्याचा चढतीचा कालखंड सुरू होईल असं निरीक्षण दामोदर यांनी नोंदवलं आहे.

 

त्यांच्या मते सचिनने अचानक निवृत्ती पत्करू नये. सचिनच्या कारकिर्दीच्या दृष्टीने २४ एप्रिल २०१२ ते २४ एप्रिल २०१३ हा महत्वपूर्ण कालखंड ठरेल. या काळात तो १०२ शतकंही झकळावेल (१+०+२=३). मी धोणी आणि सचिन यांच्यावर २००७ सालापासून ब्लॉग लिहित आहे. प्रभावशाली अंकांच्या आधारावरच मी भारत २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकेल असं भाकित केलं होतं.

 

दामोदरन यांनी ओमेन चंडी, जे.जयललिता आणि ममत बॅनर्जी निवडणुका जिंकतील असं भाकित निवडणुकांपूर्वी एक वर्ष आधी केलं होतं. तेंडूलकरच्या बाबतीत ३/६/९ या अंकांनी त्याच्या आयुष्यावर मोठी प्रभाव टाकला आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला होता त्यामुळे त्याचा जन्मांक ६ आहे. तर त्याची झोडियाक साईन टऊरस आहे त्याचं प्रतिनिधीत्व ६ अंक करतो. सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पंधरा तारिख सहा अंकांचे प्रतिनिधीत्व करते.