www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत मुंबईसमोर २०८ धावांचे आव्हान उभे केले आहे. कर्णधार सेहवागच्या तडाकेबंद ७३ आणि जयवर्धनेच्या ५५ धावांच्या मदतीने दिल्लीने मुंबईसमोर हा धावांचा डोंगर उभा केला आहे.
पिटरसन ५० आणि नमन ओझा ५ धावा काढून नाबाद राहिले आहेत. सलामीची जोडी महेला जयवर्धने आणि सेहवागने मुंबईच्या गोलंदाजांना फो़डून काढत शानदार अर्धशतक पूर्ण केले. तर केवीन पीटरसने केवळ २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह अर्धशतक केले.
जयवर्धने ५५ धावा काढून बाद झाला. सेहवाग ७३ धावांवर बाद झाला. इरफान पठाण शुन्यावर बाद झाला. सुरवातीच्या तिन्ही विकेट्स रॉबिन पिटरसने घेतल्या. मलिंगाने टेलर आणि योगेश नागरला बाद केले. मलिंगाने दोघांनाही एकापाठोपाठ एक पायचित केले. दिल्लीने ५ गडी गमवात २०७ धावा केल्या.
मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या या पाचव्या सिजनमध्ये दिल्ली आणि मुंबईने ऐकूण ७-७ सामने खेळले आहेत. त्यात दिल्लीने ५ तर मुंबईला ४ सामन्यात विजय मिळविला आहे.
आजचा संघ
दिल्ली डेअरडेव्हिल्स - महेला जयवर्धने, वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), केव्हिन पीटरसन, आरोस टेलर, नमन ओझा, इरफान पठाण, योगेश नागर, मोर्न मॉर्केल, शाहबाज नदीम, उमेश यादव, अजीत आगरकर
मुंबई इंडियन्स - ब्लिजार्ड, सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, कीरोन पोलार्ड, अबाती राईडू, रॉबिन पीटरसन, हरभजन सिंह (कर्णधार), आरपी सिंह, मलिंगा, राहुल शुक्ला.