रंगतदार भारत-ऑस्ट्रेलिया सिरीज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मॅचेस नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरतात. आत्तापर्यंत भारतामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. तर ऑस्ट्रेलियात अपेक्षेप्रमाणे कांगारु. या दोन्ही टीम्सच्या मॅचेसमध्ये ठरलेल्या काही रोमांचक क्षणांवर टाकूयात एक नजर.

Updated: Dec 25, 2011, 11:24 PM IST

झी २४ ताससाठी वृषाली देशपांडे, मुंबई

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मॅचेस नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरतात. आत्तापर्यंत भारतामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. तर ऑस्ट्रेलियात अपेक्षेप्रमाणे कांगारु. या दोन्ही टीम्सच्या मॅचेसमध्ये ठरलेल्या काही रोमांचक क्षणांवर टाकूयात एक नजर.

सचिन तेंडुलकर विरुद्ध शेन वॉर्न
 
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्यातील रायव्हलरी अवघ्या क्रिकेटविश्वाला सर्वश्रुत आहे. 1998 पासून या दोघांमधील युद्धाला सुरुवात झावली. भारताता झालेल्या या सीरिजमध्ये वॉर्नला सचिनला केवळ एकदाच आऊट करण्यात यश आलं. तर सचिननं 446 रन्स करत मॅन ऑफ द सीरिजचा किताबही पटकावला. वॉर्नला तीन टेस्टमध्ये 10 विकेटच घेता आल्या. 
 
 
लक्ष्मण-द्रविडची मॅचविनिंग पार्टनरशिप
 
कोलकाता आणि ऍडलेड टेस्टमध्ये भारताच्या विजयात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यातील पार्टनरशिप. दोन्ही मॅचमध्ये भारत पराभवाच्या छायेत होता. मात्र या दोघांनी टीमला अडचणीतून बाहेर काढत विजयश्री मिळवून दिला आहे. 2001 मधील कोलकाता टेस्टमध्ये या दोघांनी 355 रन्सची पार्टनरशिप केली. तर ऍडलेड टेस्मध्य. त्यांनी 303 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली होती. कोलकाता आणि ऍडलेडमध्ये आघाडी घेऊनही कांगारुंना पराभव स्वीकारावा लागला होता. 
 
 
हरभजन सिंगची ड्रीम टेस्ट सीरिज
 
 
अनिल कुंबळेच्या अनुपस्थितीत भारताला 2001 मध्ये कांगारुंविरुद्धची टेस्ट सीरिज खेळावी लागली होती. कॅप्टन सौरव गांगुलीनं हरभजन सिंगला घेऊन धोका पत्करला होता. मात्र भज्जीनं 32 विकेट्स घेत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यानं पॉन्टिंगला तब्बल पाच वेळा आऊट केलं. आणि तेव्हापासूनच भज्जी-पॉन्टिंग द्वंद्वाला सुरुवात झाली. कोलकाता टेस्टमध्ये त्यानं हॅटट्रिकही घेतली होती. अशी कामिगिरी करणारा तो भारताचा पहिला टेस्ट बॉलर ठरला होता. या सीरिजनंतर कांगारुंनी त्याला टर्बनेटर ही उपाधी दिली. 
 
 
रिकी पॉन्टिंगच्या बॅटिंगचा जलवा
 
2003 मध्ये रिकी पॉन्टिंगच्या बॅटची जादू चांगलीच चालली होती. त्य़ानं ऍडलेड आणि मेलबर्न टेस्टमध्ये लागोपाठ डबल सेंच्युरी झळकावल्या होत्या. त्यानं या सीरिजमध्ये 709 रन्स ठोकून काढले होते. मेलबर्न टेस्ट पॉन्टिंगच्या 257 रन्सच्या खेळीमुळे कांगारुना जिंकता आली होती. या विजयासह कांगारुंनी सीरिजही बरोबरीत सोडवली होती. 
 
 
35 वर्षांनंतर कांगारुंचा भारतात सीरिज विजय
 
ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा नागपूर टेस्टमध्ये 342 रन्सनी धुव्वा उडवला आणि 35 वर्षानंतर भारताला भारतामध्ये पराभूत करण्याची किमया केली. 1969 मध्ये ऑस्ट्रेलियानं बारतामध्ये टेस्ट सीरिज विज मिळवला होता. ग्लेन मॅकग्रा आणि जेसन गेलेस्पी ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. 1998 ते 2004 पर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये य़ा क्रिकेटपटूंची कामगिरी दोन्ही टीमसाठी मॅचविनिंग कामगिरी ठरली.