'रणजी' ट्रॉफीवर राजस्थानचा कब्जा

राजस्थाननं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या इनिंगच्या आघाडीवर राजस्थानच्या टीमनं रणजी सीरीजमध्ये बाजी मारली आहे. विनित सक्सेना राजस्थानच्या विजयाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरला. त्याची २५७ रन्सची इनिंग राजस्थानच्या विजयात निर्णायक ठरली.

Updated: Jan 24, 2012, 08:48 AM IST

www.24taas.com, चेन्नई

राजस्थाननं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या इनिंगच्या आघाडीवर राजस्थानच्या टीमनं रणजी सीरीजमध्ये बाजी मारली आहे. विनित सक्सेना राजस्थानच्या विजयाचा खऱ्या अर्थानं हिरो ठरला. त्याची २५७ रन्सची इनिंग राजस्थानच्या विजयात निर्णायक ठरली.

त्याच्या या मॅचविनिंग इनिंगमुळे विनीत सक्सेनाला प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. दरम्यान, राजस्थाननं आपली दुसरी इनिंग २०४ रन्सवर घोषीत केली. त्यानंतर दुसऱ्या इनिंमध्येही तामिळनाडूची टीमची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांचे दोन बॅट्समन सात रन्सवरच आऊट झाले.

तामिळनाडूंने २ विकेट् गमावून ८ रन्स केले असताना रेफ्रींनी मॅच ड्रॉ झाल्याच घोषीत केलं. आणि राजस्थाननं दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचं अजिंक्यपद पटकावलं. ऋषीकेष कानिटकरच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राजस्थानं कमाल केली. बलाढ्य टीम्सना पराभूत करत राजस्थाननं अखेर रणजी विजेतपदाला गवसणी घातली.