www.24taas.com, पल्लेकल
भारताच्या २९५ धावांचे पाठलाग करताना श्रीलंकेने सर्व गडी गमावत ४५.४ षटकात २७४ धावा केल्या. दहावी विकेट असताना मलिंगाने चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे भारताच्या तोंडातील विजयाचा घास तो काढणार असे वाटत असताना झेलबाद झाला आणि भारताचा विजय साकारला. भारताने ४-१ने मालिका खिशात टाकली.
मेंडिस अर्धशतक करून बाद झाला. इरफानने एकाच ओव्हरमध्ये मेंडीस आणि परेराला बाद केले. इरफानने पाच विकेट घेत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. भारताने सिरीजवर ४-१ ने कब्जा मिळवला. त्यामुळे भारताची आयसीसी रॅंकिगमध्ये सुधारणा झाली असून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
थिरमने ७७ धावा करून बाद. इरफान पठाणने दिलशानला शुन्यावर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर थरंगा ३१ धावाकाढून इरफानच्या गोलंदाजीवर मनोज तिवारीकडे झेल देत बाद झाला. तेव्हा लंकेच्या खात्यावर केवळ १३ धावा जमा झाल्या होत्या. डिंडाने लंकेच्या चंडीमलला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. तर मनोज तिवारीने शानदार थ्रो करत मॅथ्यूजला तंबूत परत पाठवले. भारताकडून लंकेला पाचवा धक्का जहीर खानच्या गोलंदाजीने दिला.
भारताने श्रीलंकेपुढे २९५ धावांचे टार्गेट ठेवलेले असताना या टार्गेटचा पाठलाग करताना लंकेचे पाच गडी १२५ धावांवर बाद झाले आहेत. २० षटकात लंकेने १२५ धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेचा पराभव निश्चित समजला जात आहे. थिरीमने आणि मेंडिस मैदानावर होते. इरफान पठाणने दिलशानला शुन्यावर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर थरंगा ३१ धावाकाढून इरफानच्या गोलंदाजीवर मनोज तिवारीकडे झेल देत बाद झाला.
भारताने ५० षटकात ७ बाद २९४ धावा केल्या आहेत. गौतम गंभीर ८८ तर मनोज तिवारी ६५ धावांवर आऊट झाला. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३८ चेंडून ५८ धावा कुटल्या. मायक्रोमॅक्स कपमधील पाचव्या व अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग जखमी असल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
संघात तो नसल्याने अजिंक्य रहाणेला सलामीला पाठविण्यात आले होते. मात्र तो केवळ ९ धावा काढून परेराच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर त्याच्या जागेवर विराट कोहली खेळायला आला. इऱफान पठाणने नाबाद २९ धावा केल्या तर आर अश्विन २ धावांवर नाबाद राहिला. विराट कोहली २३, सुरेश रैना शून्यावर, रहाणे ९ , आर शर्माने ४ धावा केल्या.