विराटचे अर्धशतक साजरे

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील दुसऱ्या वनडे मॅचमध्ये इंडिया हळूहळू विजयाकडे कूचकरीत आहे. सचिन 48 रनवर आऊट झाल्यानंतर त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने फक्त 10 रनची भर घालून परतीची वाट धरली. त्याला परेराने दिलशान करवी कॅचआऊट केले.

Updated: Feb 8, 2012, 06:03 PM IST

www.24taas.com,पर्थ

 

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील दुसऱ्या वनडे मॅचमध्ये इंडिया हळूहळू विजयाकडे कूचकरीत आहे. सचिन 48 रनवर आऊट झाल्यानंतर त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने फक्त 10 रनची भर घालून परतीची वाट धरली. त्याला परेराने दिलशान करवी कॅचआऊट केले. पण अजुनही विराट कोहली मात्र चांगली खेळी करत आहे त्याने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले आहे. त्यामुळे भारत विजय मिळवण्याची आशा बळकट झाली आहे. विराट कोहलीने संयमी खेळी करत 75 बॉलमध्ये 59 रन केले त्यात त्याने 7 फोर मारले. त्याच्या खेळीने भारत खिंड त्याने एकाबाजूने लढवत ठेवली आहे.

 

मॅचचे  LIVE  अपडेट पाहाण्यासाठी क्लिक करा.

 

अजूनही भारताला जिंकण्यासाठी 19 ओव्हरमध्ये 85 रनची गरज आहे. विराट कोहली 59 रनवर खेळत आहे तर सुरेश रैना 23 रनवर बॅटींग करीत आहे. जर भारताने हा सामना जिंकल्यास तिरंगी लढतीत चांगलीच चुरस निर्माण होईल.

 

ऑस्ट्रेलियातील तिरंगी सीरीजमधील भारत वि. श्रीलंका या दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा सचिनने निराशाच केली आहे. सेहवाग सोबत आलेल्या सचिनने खरं तर आज आश्वासक आणि चांगली सुरवात केली होती. काही चांगले आणि खणखणीत फटके देखील त्याने मारले. तो फॉर्ममध्ये आला आहे असं वाटत असताना श्रीलंकेच्या मध्यमगती बॉलर अॅंजोलो मॅथ्यूसने सचिनला बोल्ड केलं.

 

सचिनने 63 बॉलमध्ये 48 रन केले त्याने 5 फोर मारले. त्यामुळे पुन्हा एकदा सचिनचच्या महाशतकाची वाट पाहावी लागणार आहे. सचिन या सीरीजमध्ये त्याचं महाशतक पुर्ण करतो की नाही हेच पाहायचं आहे. सचिन आऊट झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा बॅटींग करत आहे. भारताला जिंकण्यासाठी आणखी 137 रनची 27 ओव्हरमध्ये गरज आहे.

 

श्रीलंकेच्या २३३ धावांचा पाठलाग करताना भारताला पहिला झटका बसला. सेहवाग मलिंगाच्या चेंडूवर थर्डमॅनच्या वरून षटाकार मारण्याचा नादात झेल बाद झाला. त्याने ८ चेंडूत १० धावा केल्या.

 

या पूर्वी लंकेने भारतासमोर २३४ रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. लंकेने ८ विकेटच्या बदल्यात २३३ रन्स केल्या. लंकेकडून सर्वाधिक रन्स चंदीमलने केल्या. त्यांने ८१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. अँजलो मॅथ्यूज  आणि मलिंगा नाबाद राहिला. मॅथ्यूजने ३३ तर मलिंगाने १ रन्स केली. तर भारताकडून सर्वाधिक विकेट आर. अश्विनने घेतल्या. त्यांने तिन बळी टिपले.

 

झटपट धावा काढण्याचा नादात तिरीमाने सात धावांवर बाद झाला. त्याला  रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने तंबूचा रस्ता पकडावा लागला. श्रीलंकेची बाजू सांभाळणाऱ्या चंदीमलला आर. अश्विनने धोनीकरवी झेलबाद केले. चंदीमलने ८१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. यात त्याने चार चौकार लगावले. या विकेटमुळे अश्विनने तिसरी विकेट घेतली. भारतीय गोलंदाजीमुळे लंकेला जास्त धावसंख्या उभारता आली नाही.

 

 

यापूर्वी जयवर्धनला तंबूत परतावणाऱ्या आर अश्विनने परेराला ७ रन्सवर आऊट करून पाचवी विकेट काढली.  श्रीलंकेची चौथी विकेट काढण्यात  भारताच्या आर अश्विनला यश आले.  त्याने  जयवर्धन २३ रन्सवर रोखले.  श्रीलंकेने डावाला चांगली सुरूवात केली होती. चांगली धावसंख्या उभी राहत असताना २६ रन्सवर कुमार संगकारा आऊट झाल्याने लंकेला तिसरा धक्का बसला. संगकाराने तिलकरत्‍ने दिलशानसोबत ६२ धावांची भागीदारी केली. सलामीवीर उपुल थरंगालाही झहीरनेच बाद केले. थरंगा ४ धावा काढून तंबूत परतला. झहीरला समोर येऊन फटकाविण्‍याच्‍या नादात पहिल्‍या स्लिपमध्‍ये त्‍याचा झेल गेला. सचिनने हा झेल सहज टिपला. त्‍यानंतर तिलकरत्‍ने दिलशान आणि कुमार संगकारा यांनी अर्धशतकी भागीदारी करुन श्रीलंकेचा डाव सावरला. दिलशानने स्थिरावल्‍यानंतर आक्रमक पावित्रा घेऊन फटकेबाजी केली.

 

 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मॅच पर्थमध्ये सुरू झाली असून श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. श्रीलंकेने २ विकेटच्या जोराव १०० रन्स केल्या. दुसरही विकेट झहीरने काढली. श्रीलंकेला पहिला धक्का झ