ही तर बीसीसीआयची खेळी - किर्ती आझाद

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या प्ररकरणावरून लक्ष हटवण्यासाठी बीसीसीआयनं ही खेळी खेळली, असा थेट आरोप करत किर्ती आझाद यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.

Updated: May 17, 2012, 01:28 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

शाहरुख खान नशेत धिंगाणा घालणं अशक्य असल्याचं मत माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी व्यक्त केलं आहे. आयपीएलमधील  स्पॉट फिक्सिंगच्या प्ररकरणावरून लक्ष हटवण्यासाठी बीसीसीआयनं ही खेळी खेळली, असा  थेट आरोप करत किर्ती आझाद यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.

 

शाहरुख खान हा एका टीमचा मालक आहे. शाहरुख खान नशेत आणि तेही लहान मुलं सोबत असताना धिंगाणा घालणं, ही केवळ अशक्यप्राय गोष्ट असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मॅच फिक्सिंगप्रकरणी लक्ष विचलीत करण्यासाठी शाहरूखचा वापर केला जातोय. आणि ही सगळी बीसीसीआयची खेळी आहे, असा गंभीर आरोप किर्ती आझाद यांनी केलाय.

 

नेमकं काय झालं होतं वानखेडेवर... 

- शाहरुख खानकडे त्याच्या एका चाहतीनं फोटो काढण्याची मागणी केली.

- फोटो काढण्याची मागणी करणाऱ्या मुलीला शाहरुखने शिवीगाळ केली.

- MCA च्या सिक्युरीटी गार्डसनी त्याला शांत राहण्यास सांगितलं.

- शाहरुखनचा मैदानात घुसण्यासाठीचा जबरदस्तीने प्रयत्न.

- मैदानात जाण्यास मनाई केल्यानं वॉचमनला शाहरुखनं शिवीगाळ आणि मारहाण केली.

- MCA अधिकारी आणि BCCI च्या अधिकाऱ्यांनी शाहरुखला शांत रहाण्याचा सल्ला दिला.

- मद्यधुंद शाहरुखने शांत राहण्याऐवजी धमक्या दिल्या.

- शाहरुखने शिवीगाळ केल्याची तक्रार MCA ने पोलिसांकडे केली.