आमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.

कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2013, 04:55 PM IST

www.24taas.com,मुंबई
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संपूर्ण राज्यात आमदारांकडून पोलिसाला झालेल्या मारहाणीमुळे संताव व्यक्त होत आहे. कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही, अशी भाषा करणारे गृहमंत्री आमदारांच्या मारहाणीबाबत वेगळीच भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. आर आर यांनी सावध भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आपण अद्याप पाहिलेले नसल्याचे आबांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आमदारांच्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची विचारपूस करण्यासाठी आर. आर. यांनी संबंधीत रुग्णालयाला भेट दिली. या भेटीनंतर रुग्णालयाबाहेर पडलेल्या गृहमंत्र्यांवर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. एरवी चिमटे काढत, किस्से सांगत पत्रकारांना सामोरे जाणारे आबा आज सावध भूमिकेत दिसले.

मारहाण प्रकरणातील दोषींना कडक शासन केले जाईल. या घटनेचा पोलिसांच्या मनोधैधर्यावर अजिबात परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे आर आर यांनी सांगून सूर्यवंशींची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले.
दरम्यान, आर आर यांनी मोठा खुलासा केलाय. ड्युटीवर असलेले सूर्यवंशी हे प्रेक्षक गॅलरीत गेलेच नव्हते. त्यांचा पाठलाग करून हल्ला करण्यात आल्याचे सूर्यवंशींचे म्हणणे आहे.