‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं’

`मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या दबावतंत्राला बळी पडू नये... खरोखरच राजीनामा देण्याचं अजित पवारांनी दाखवलं असेल तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं`

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 25, 2012, 08:26 PM IST

www.24taas.com, मुंबई
`मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या दबावतंत्राला बळी पडू नये... खरोखरच राजीनामा देण्याचं अजित पवारांनी दाखवलं असेल तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं` असं आव्हान शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.
‘भानगडींची चौकशी न होऊ देण्यासाठी अजित पवारांचं आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं हे सगळं राजीनामानाट्य सुरू आहे... अशी टगेगिरी महाराष्ट्राला मान्य होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं आणि राष्ट्रवादीच्या तमाशाला भीक न घालता त्यांचे राजीनामे मंजूर करावेत’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यावर बोलताना, हे त्यांचं नाटक सुरु आहे... राज्यात राजीनामे दिले तर राज्यासोबत त्याचा परिणाम केंद्र पातळीवरही दिसून येईल आणि त्यामुळेच केवळ दबावासाठी ही सगळी राष्ट्रवादीची खेळी उघड होत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
असं जर खरोच घडंल तर, गणेशोत्सवाच्या काळात विघ्नहर्ता खरोखर महाराष्ट्रावर प्रसन्न झालाय आणि राष्ट्रवादीची भ्रष्टाचारी ब्याद कायमची गाडून टाकेल असं म्हणता येईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.