पुणेकरांना आज दिवसभर पालख्यांच्या दर्शनाचा लाभ!

विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 2, 2013, 10:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.
पुण्यात माऊलींची पालखी दाखल झाल्यानंतर त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखीचा काल पुण्यातच मुक्काम होता. सोमवारी सकाळी आळंदीच्या गांधीवाड्यातून माऊलींची पालखी पुढे मार्गस्थ झाली होती. आळींदीतून पालखीचा प्रवास फुलेनगरकडून पुढे संगमवाडी पूल आणि तेथून पुढे पुण्यात शिवाजी नगरच्या दिशेने झाला. भवानी पेठेतील विठोबा मंदिरात पालखीचा मुक्काम आहे.
दरम्यान, जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखीही आकुर्डीतील मुक्कामानंतर पुण्यात पोहचलीय. पुण्यात मोठ्य़ा उत्साहात पालखीचं स्वागत झालं. नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम तुकोबांचा मुक्काम आहे.

ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांचा आजचा संपूर्ण दिवस पुण्यात मुक्काम असेल. त्यामुळे आज संपूर्ण दिवसभर पुणेकरांना पालख्यांच्या आणि वारकऱ्यांच्या दर्शनाचा लाभ होऊ शकेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.