www.24taas.com, सॅन डियागो
प्रसिद्ध सतारवादक भारतरत्न पंडित रविशंकर यांचं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. अमेरिकेतल्या सॅन डियागोत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनसंस्था आणि हृद्यविकाराचा त्यांना वर्षभरापासून त्रास सुरू होता.
रविशंकर यांचा जन्म वाराणसी येथे ७ एप्रिल १९२० रोजी झाला. संगीत क्षेत्रातील अढळस्थान प्राप्त करणारे पंडित रविशंकर यांच्या निधनाने संपूर्ण संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
रविशंकर यांच्या सतारवादनाची चाहत्यांना नेहमीच ओढ लागलेली असायची. पंडितजींनी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात संगीताचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.
पंडितजींनी नृ्त्यापासून सुरवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी संगीतक्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं, आणि त्यानंतर मात्र कधीही मागे वळून पाहिलं नाही.
रविशंकर यांना १९९९ मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्न`ने सन्मानित करण्यात आले होते. रविशंकर यांना तीन वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.