www.24taas.com, औरंगाबाद
प्रक्षोभक भषण दिल्याप्रकरणी हैदराबादेत एमआयएमचे वादग्रस्त आमदार अकबरुद्दीन ओवेसी मंगळवारी अटक करण्यात आली होती. २४ डिसेंबरला ओवेसी यांनी हिंदू धर्मियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र ओवैसींच्य़ा या भाषणाचं मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांनी चक्क समर्थन केलं आहे.
साहित्य अकादमीच्या संमेलनाच्यावेळी नेमाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ओवैसी यांच्या प्रक्षोभक विधानांची पाठराखण केली. यावेळी नेमाडे यांनी स्वा. सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनाच याबद्दल दोषी ठरवलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी भारतात मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण केलं. तेव्हा जर एखाद्या मुस्लिम नेत्याने हिंदूंवर त्वेषाने आसूड ओढल्यास त्यात काय चूक? असा सवाल नेमाडेंनी विचारला. तसंच हिंदुत्ववादाचाच मराठीला धोका असल्याचं वक्तव्यही नेमाडे यांनी केलं आहे.
तसंच, साहित्य संमेलनावर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी हल्लाबोल केला. ही संमेलने साहित्याशी संबंधितच नाही त्यामुळे शहाणी माणसं या साहित्य संमेलनांना जात नाहीत, असा टोला त्यांनी लगावलाय. ही संमेलने म्हणजे साहित्यावरची सूज आहे. त्यापेक्षा ज्ञानेश्वरीची पारायणे करा, असा सल्ला त्यांनी दिलाय.