www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये मंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात सिडको पोलिसांना यश आलंय. त्यात सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत. चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी मात्र फरार झालेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून औरंगाबाद शहरात मंगळसूत्र चोरांनी धुमाकूळ घातला होता... मंगळसूत्र चोरीला जाईल या भीतीनं महिला घराबाहेर निघायलाही घाबरत होत्या... अनेक वेळा प्रयत्न करूनही पोलीस मंगळसूत्र चोरांना पकडण्यात अपयशी ठरत होते. अखेर सिडको पोलिसांना या मंगळसूत्र चोरांना पकडण्यात यश आलंय.
चोरीसाठी वापरलेल्या दुचाकीही या चोरांकडून जप्त करण्यात आल्यात. सिडको पोलिसांनी श्रीरामपूरमधून इराणी टोळीचे राज फौलाद आणि फेरोज सुलताना इराणी यांच्या मुसक्या आवळल्यायत. सिडको, मुकुंदवाडी, सातारा परिसरातून जानेवारी २०१३ पासून ते आतापर्यंत मंगळसूत्र चोरीच्या ३८ घटना घडल्यायत. त्यातले १८ गुन्हे उघडकीस आणण्यात यश
मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं असून या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताय. इराणी टोळीचे सदस्य गुन्हेगारी क्षेत्रात सराईत असून रेकी करण्यासाठी ते कधीकधी गॉगल विक्रेते म्हणून फिरत असल्याचं समोर आलंय. तसंच त्यांच्या अन्य दोन साथीदारांचाही पोलीस शोध घेतायत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.