चोरट्यांची सोन्याची विल्हेवाटीचा भन्नाट मार्ग

सोन्यावर डल्ला मारणा-या चोरट्यांनी आता चोरीच्या सोन्याची विल्हेवाट लावण्याची भन्नाट आयडिया शोधून काढलीय. एरवी सोनाराकडे सोनं विकताना पोलिसांची भीतीही असायची आणि सोनार पैसैही देत नसे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 14, 2013, 08:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, विशाल करोळे औरंगाबाद
सोन्यावर डल्ला मारणा-या चोरट्यांनी आता चोरीच्या सोन्याची विल्हेवाट लावण्याची भन्नाट आयडिया शोधून काढलीय. एरवी सोनाराकडे सोनं विकताना पोलिसांची भीतीही असायची आणि सोनार पैसैही देत नसे. म्हणून आता चोरट्यांनी भरपूर फायद्याची शक्कल शोधून काढलीये.. पाहूयात काय आहे चोरांची ही आयडियाची कल्पना...
गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात महिलांच्या मंगळसूत्र चोरीच्या घटनात प्रचंड वाढ झालीय. खुद्द राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही ही बाब औरंगाबाद दौ-यात मान्य केली होती.
सोनारांवर नजर ठेवून चोरीला आळा घालण्याचा तोकडा प्रयत्नही केला. त्यातून काही चोरांना पोलिसांनी पकडलंही. मात्र त्यांच्याकडे पोलिसांना सोनं काही सापडलं नाही.. त्यातूनच सुरू झालं चौकशीचं सत्र... चौकशी सत्रानंतर पोलिसांनी मिळालेली माहिती मात्र अवाक करणारी होती..
चोर आता चोरीचं सोनं सोनाराला विकत नसून सोन्यावर कर्ज देणा-या फायनान्स कंपन्यात तारण ठेवत असल्याची ही माहिती होती... त्यामुळं चोरांचं चांगलंच फावलंय. औरंगाबादच्या अनेक बँकांमध्ये असे निनावी सोनं सापडल्याच्या घटना समोर आल्यायत. त्यामुळं पोलिसांनी आता सोनं तारण ठेवताना तारण ठेवणा-या व्यक्तीचा फोटो आणि कागदपत्राची प्रत ठेवण्याची विनंती या फायनान्स कंपन्यांना केलीय.
या प्रकारामुळं फायनान्स कंपन्या अडचणीत आल्यायत. त्यामुळं येणा-या काळात सोनं तारण ठेऊन घेताना या कंपन्यांना आपली भूमिका बदलावी लागणार हे नक्की...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.