मी कुणाचंही घर फोडलं नाही- अजित पवार

माझ्यावर झालेला घरफोडीचा आरोप चुकीचा असून, आपण कुणाच घर फोडलं नसल्याचं स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 11, 2013, 02:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जालना
विरोधकांकडे कुठलेही पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप सातत्याने होत असून आपल्याला सतत टीका केली जात असल्याचा आरोप करत अजित पवारांनी गोपीनाथ मुंडेवर नाव न घेता जोरदार टीका केली. माझ्यावर झालेला घरफोडीचा आरोप चुकीचा असून, आपण कुणाच घर फोडलं नसल्याचं स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिलं.
बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर समाजाला संघटीत करण्याचा प्रयत्न केला असला तरी जातीपातीच्या राजकारणाने समाजाचे प्रश सुटत नसून बाळासाहेबंसारखं नेतृत्व आता शिवसेनेत उरल नसून शिवसेनेचे नेते मुंबईत राहून राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.
राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने याबाबत धाडस करून निर्णय घेण्याची गरज नसूनही मान्यता न मिळाल्यास याची जबरदस्त किंमत राज्याला मोजावी लागत असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय. या बाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याचही अजित पवारांनी नमूद केलं. ते जालन्यातील समर्थ कारखान्याच्या गाळपाच्या शुभारंभाच्या भाषणात बोलत होते..
सध्या राज्यात चालू असलेल्या उसाच्या भाववाढीसंदर्भातही अजित पवार यांनी भाष्य केल. उस दराबाबत शेतकरी संघटनांनाकडून होत असलेल्या आंदोलनाबाबत टीका करत हा भाव देण शक्य नसल्याच पवार यांनी स्पष्ट केल. साखरेची विक्री थेट कारखान्यातूनच ४५ रुपये दराने विक्री झाल्यास उसाला चांगला भाव देणं शक्य असल्याच अजित पवार यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.