टिटवाळ्यात ज्वेलरला लुटलं

टिटवाळ्यामध्ये ओम साई ज्वेलर्सचे मालक अरविंद शेलार दुकान बंद करून सोनं घरी घेऊन जात असताना त्यांना लुटल्याची घटना घडली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 11, 2013, 01:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, टिटवाळा
टिटवाळ्यामध्ये ओम साई ज्वेलर्सचे मालक अरविंद शेलार दुकान बंद करून सोनं घरी घेऊन जात असताना त्यांना लुटल्याची घटना घडली आहे.
स्विफ्ट डिझायरमध्ये बसलेल्या शेलार यांना यावेळी दरोडेखोरांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला. त्यानंतर ज्वेलर्सचे मालक शेलार यांनी गाडीच्या काचा वर केल्या. त्यावेळी दरोडेखोरांनी काचा कोयत्यानं फोडल्या आणि त्यांच्या डोक्यावर वार केले. यावेळी त्यांचे भाऊ गुरू यांच्यावरही हल्ला झाला. त्याचबरोबर दोघांवर गोळीबार झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
मात्र पोलिसांनी त्याला कुठलाही दुजोरा दिलेला नाही. पाच ते सहा अज्ञातांनी शेलार आणि त्यांच्या भावावर हल्ला केला आहे. हल्लेखोर इनोव्हा गाडीतून आले होते. ज्वेलर्स शेलार आणि त्यांच्या भावावर कल्याणच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.