कालव्यांच्या पाण्यावरून `रास्ता रोको`

अहमदनगर-मनमाड मार्गावर आज सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको केला. ‘मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही, मात्र उन्हाळी हंगामात गोदावरी कालव्यांना दोन आवर्तन मिळावी’, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 28, 2012, 12:28 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
अहमदनगर-मनमाड मार्गावर आज सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको केला. ‘मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही, मात्र उन्हाळी हंगामात गोदावरी कालव्यांना दोन आवर्तन मिळावी’, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
भंडारदऱ्यातून अडीच टीएमसी पाणी दिले आहे. मात्र, जायकवाडी धरणात १३.१६ टीएमसी पाणी शिल्लक राहत असताना आमच्या वाट्याच्या पाण्याची मागणी कशासाठी असा सवाल माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सरकारला केलाय. जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे साडेसात टीएमसी पाणी जाऊ शकते.
परळीलाही कालव्यांद्वारेच पाणी देता येणे शक्य असल्याचं यावेळी मत मांडण्यात आलंय. मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध नाही, मात्र सरकारचं धोरण चुकत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.