www.24taas.com,विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद
मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीनं जग जसं जोडलं गेलंय तसंच या क्रांतीचे आता वाईट परिणामही समोर येऊ लागलेत. ज्ञान आणि माहितीचे स्त्रोत खुले करणा-या या माध्यमांचा छळांसाठीही वापर केला जात असल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलंय. पाहूयात यासंदर्भातला एक रिपोर्ट
सायबर क्राईमच्या माध्यमातून महिलांचे छळ होण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून 99 टक्के मुली आणि महिलांचा छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या `महिला आणि मुलांचा सहायता कक्षामार्फत झालेल्या संशोधनातून हे धक्कादायक सर्वेक्षण समोर आलंय.
पाहूयात कुठल्या माध्यमातून महिलांचा छळ होतोय.
ई मेल सर्फिंगमध्ये महिलांचे ई मेल हॅक करून डाटा बदलला जातो. सायबर डेफेमेशन प्रकारात अश्लील एसएमएस किंवा सोशल साईटवर महिलांचे अश्लील फोटो लोड करुन बदनामी केली जाते.
मॉर्फिंग या छळाच्या प्रकारात मूळ चित्रणात किंवा फोटोत बदल करून तयार केलेले अश्लील फोटो सेक्सो वेबसाईटवर किंवा सोशल साईटवर टाकले जातात. ई-हरॅसमेंटमध्ये महिलांना कार्ड पाठवणं, चिठ्ठी पाठवणं, सार्वजनिक भिंतीवर बदनामीकारक मजकूर लिहिणं, किंवा महिलांच्या ई-मेल किंवा मोबाईलवर संवाद साधून त्रास दिला जातो. सायबर पोर्नोग्राफी प्रकारात महिलांचे अश्लीेल चित्रण तयार करून त्याच्या मदतीनं ब्लॅकमेल करणे किंवा धमक्यां देणे, असे प्रकार केले जातात. सायबर स्टॉकींग प्रकारात महिलांच्या दिवसभराच्या दिनचर्येवर लक्ष ठेवून त्रास देतात.
महाविद्यालयीन तरुणींना या प्रकाराचा अधिक त्रास होत असल्याचं निदर्शनास आलंय. मोबाईल वापरताना मुलींना झालेल्या त्रासाचं स्वरूप या सर्वेक्षणात जाणून घेतलं. पाहूयात त्यात मुलींना होणा-या त्रासाचं नेमकं काय स्वरूप समोर आलं?
14 टक्के मुलींना आक्षेपार्ह आणि अश्लीधल एसएमएस`, एमएमएस` पाठविण्यात आले. 26 टक्के मुलींना मिस कॉलच्या माध्यमातून त्रास देण्यात आला. तर 25 टक्के मुलींना वेळी अवेळी फोन करून त्रास देण्यात आला होता. तर 16 टक्के मुलींना या सर्वच प्रकाराचा त्रास झालाय.
या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी मुलींनी स्वत:हूनच काही उपाय केले.
56 टक्के मुलींनी सिमकार्ड बदलून घेतलं, 30 टक्के मुलींनी संबंधित मुलास समज देण्याचा प्रयत्न केला. 2 टक्के मुलींनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. 5 टक्के मुलींनी मुलांना समज देऊन सिमकार्ड बदलले.
यावरून पोलिसांकडे तक्रार करणा-यांची संख्या अजूनही कमीच असल्याचं दिसून आलं.
मोबाईल प्रमाणंच इंटरनेटचा वापर आणि मुलींना होणारा त्रास या बद्दलची स्थिती तर आणखीनच भयावह आहे..
99 टक्के मुली या "फेसबुक` या सोशल साईटचा वापर करतात. या अभ्यासामध्ये 53 टक्के मुलींना इंटरनेट वापराच्या त्रासातून जावं लागलं. त्यामध्ये 17 टक्के मुलींना इंटरनेट ई-मेलच्या माध्यमातून अश्लीेल फोटो पाठवले गेले. 32 टक्के मुलींना त्यांच्या स्वत:च्या फोटोत बदल करून पाठवले गेले. 3 टक्के मुलींना अश्लीाल फिल्म पाठवली गेली.
औरंगाबाद शहरातल्या महाविद्यालयीन तरुणींचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हा अहवाल महिला आणि मुलांकरिता सहायक कक्षाकडून टाटा रिसर्च इन्स्टिट्यूटला पाठविण्यात येणारेय. आणि त्यानंतर देशपातळशीवरही असाच सर्व्हे केला जाणारेय..मात्र विकासासाठी बनलेल्या या तंत्रज्ञानातून निघणारे हे धक्कादायक निष्कर्ष निश्तितच विचार करायला लावणारेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.