www.24taas.com, मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांना मूक श्रद्धांजली अर्पण कण्यासाठी मुंबईत आज सोमवारी स्वयंस्फूर्तीने चित्रपट, नाट्य गृह आणि शाळा, महाविद्यालय, सराफा दुकान, कापड दुकाने बंद आहेत तर नवी मुंबईत एफएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत.
बस चालकांनी वयंस्फूर्तीने बस बंद ठेवल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर मुंबईत काही मोठे उद्योग, बाजारपेठा, शॉपिंग मॉल, हॉटेल, चित्रपटगृहे, भाजी मंडई यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून बाळासाहेब ठाकरे यांना रविवारी मूक श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे दिवसभर शहरात नीरव शांतता पसरली होती. शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने पाळलेला हा उत्स्फूर्त बंद ऐतिहासिक ठरला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे औद्योगिकनगरीवर शनिवारी दुपारपासून शोककळा पसरली. मराठी मनाचा बुलंद आवाज गेल्याने दुःख कोसळलेल्या शहरवासीयांनी कालपासूनच बाजारपेठांतील लहान मोठी दुकाने, हॉटेल, चित्रपटगृहे, उद्याने बंद केली. सायंकाळी सातनंतर सर्व रस्ते, चौक अक्षरशः ओस पडले होते. दिवाळीच्या सणानिमित्त घरांवर लावण्यात आलेले आकाशकंदील काढण्यात आले.
उद्योजकांसह सराफ व्यावसायिक, चित्रपटगृहचालक, हॉटेलचालक, लहान मोठे दुकानदार, भाजीविक्रेते, मटणविक्रेते, टपरी, पथारीधारक आणि टॅक्सी-रिक्षाचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व दुकाने, कार्यालये बंद होती. शहरातील अनेक उद्योग बंद ठेवण्यात आल्याने औद्योगिक परिसरातही शुकशुकाट होता.
शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स उभारून शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे चित्र होते.