कुंडलीत कालसर्पचा योग असणाऱ्यांना अनेकवेळा संकटाचा सामना करावा लागतो.
कोणतेही कार्य वेळेवर होत नाही. ज्याकडे कुंडली नसेल त्यांना ज्योतिषाकडून माहिती मिळते. काहीवेळा व्यक्तीला स्वप्नात साप दिसत असेल तर त्याच्या कुंडलीत कालसर्पचा योग आहे, हे निश्चित मानावे.
ज्योतिष शास्त्रात काही योग सांगितले जातात. त्यापैकी कालसर्प हा एक योग आहे. तसेच गडकेसरी, मालव्य, भद्र, हंस, अंगारक आदी योग तर पितृ दोष आणि चांडाल योग जास्तप्रमाणात वाईट प्रभावशाली असतात. त्यामुळे कुंडलीवरून त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. तसेच कुंडलीशिवाय या योगांची माहिती जाणून घेवू शकतो. त्यासाठी ज्योतिष शास्त्रात विविध पद्धती आहेत.
- झोपलो असतांना आपल्या अंगावर साप येईल, या भितीने आपण घाबरून जाणे.
- पाण्यावर तरंगताना साप पाहाणे
- स्वप्नामध्ये उडणारा साप पाहाणे.
- सापाची जोडी हाताला आणि पायाला लपटलेली पाहाणे.
- स्वप्नामध्ये अनेक साप दिसणे.
अशा प्रकारे कधीही पडलेल्या स्वप्नात साप दिसणे म्हणजे आपल्या जीवनात कालसर्प दोष असल्याचा हा संकेत आहे. स्वप्नामध्ये वारंवार साप दिसल्यानंतर कालसर्पची पुजा करणे आवश्यक आहे. तसेच कालसर्प दोषाला शांत करण्यासाठी शांती करणे गरजेचे आहे. त्यामुळे आवल्याला मानसिक शांती मिळते. तर वाईट पडणारी स्वप्ने बंद होतात.