मुंबई : प्राचीन भारतीय संस्कृतीत आत्मा ही 84 लाख योनीमध्ये जन्म घेऊन मनुष्य योनीमध्ये जन्म घेते अशी मान्यता आहे. स्वप्नाच्या माध्यमातून आत्मा ही विभिन्न योनीचे अनुभव पुन्हा स्मरणात आणते. हेच स्वप्न पुढे भविष्यात जीवनातील शुभाशुभचे संकेत देतात अशी मान्यता आहे.
आम्ही तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या गोष्टी तुम्हाला स्वप्नात दिसल्या की त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.
१. जर तुम्हाला स्वप्नात मुंग्या दिसल्या तर ते धनलाभ होणार असल्याचे संकेत आहेत.
२. जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही कानात बाळी घालतांना दिसत असाल तर ते भविष्यात तुम्हाला धनलाभ होणार असल्य़ाचे संकेत आहेत.
३. जर तुम्हाला स्वप्नात सोनं दिसले तरीही धन प्राप्ती होणार असल्याचे ते संकेत आहेत.
४. स्वप्नात गो-माता चे जर तुम्हाला दर्शन झाले तर ते शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला धन सोबत वैभव आणि समृद्धीची ही प्राप्ती होऊ शकते.
५. जर तुम्ही स्वप्नात आंब्याचं किंवा इतर कोणतंही फळाचं झाड दिसलं तर तुम्हाला अचानकपणे धन मिळण्याचे संकेत आहे. अशी मान्यता आहे.