महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघताना दही का खातात?

हिंदू धर्मात अनेक परपंरा आहेत ज्या देशाच्या विविध भागात पाळल्या जातात. यातील एक म्हणजे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी एखादा व्यक्ती बाहेर जात असेल तर त्याच्या हातावर दही खाण्यासाठी दिले जाते. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?

Updated: Jan 22, 2016, 11:01 AM IST
महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघताना दही का खातात? title=

नवी दिल्ली : हिंदू धर्मात अनेक परपंरा आहेत ज्या देशाच्या विविध भागात पाळल्या जातात. यातील एक म्हणजे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी एखादा व्यक्ती बाहेर जात असेल तर त्याच्या हातावर दही खाण्यासाठी दिले जाते. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?

जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघता तेव्हा घरातील वडीलधारे आपल्याला दही-साखर खाऊन जाण्याचा सल्ला देतात. हिंदू धर्मात दह्याला पंचामृत मानले जाते. यामुळे कामात कोणताही अडथळा येत नाही. मन शांत राहिल्याने हाती घेतलेले काम पूर्ण होते. दही खाण्याने नकारात्मक विचार नाहीसे होतात. शरीरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. त्यामुळे दही-साखर खाण्याची ही पद्धत आहे. 

ज्योतिषानुसार सफेद रंग चंद्रकारक मानला जातो. तसेच सफेद वस्तू खाऊन घराबाहेर पडल्यास त्या कामामध्ये मन एकाग्र होते.