पत्नीची कुंडली सांगते पतीचंही भविष्य!

ग्रहांमधील केतू या ग्रहाची स्थिती स्त्रियांच्या कुंडलीमध्ये प्रभावशील ठरतो. आज आपण पाहुयात... हा ग्रह कशा प्रकारे स्त्रियांच्या आणि अर्थातच त्यांच्या जोडीदाराच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करतो...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 22, 2013, 08:12 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहांच्या स्थितीनुसार आणि ठिकाणावरून त्या व्यक्तीच्या भविष्यातील गोष्टींचा अंदाजा येऊ शकतो. कुंडलीतील ग्रहांमुळे स्त्री किंवा पुरुषाच्या भविष्याचा अंदाजा घेता येतो. या ग्रहांचा परिणाम अर्थातच त्यांच्या जोडीदाराच्या आयुष्यावरही पडतो. जीवनातील यश, अपयश, सुख, दु:ख, स्वभावातील चढ-उतार, आर्थिक संपन्नता या बाबींचा परिणाम जोडीदाराच्या जीवनात निश्चितच होत असतो.
ग्रहांमधील केतू या ग्रहाची स्थिती स्त्रियांच्या कुंडलीमध्ये प्रभावशील ठरतो. आज आपण पाहुयात... हा ग्रह कशा प्रकारे स्त्रियांच्या आणि अर्थातच त्यांच्या जोडीदाराच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करतो...
> जर एखाद्या मुलीच्या कुंडलीत प्रथम स्थानामध्ये केतू असेल तर, ती स्त्री रोगग्रस्त आणि पतीला त्रास देणारी असते. जर त्या स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर स्त्रीला पती आणि मुलाकडून सुख प्राप्त होते.
>ज्या मुलींच्या कुंडलीत द्वितीय स्थानामध्ये केतू ग्रह असेल तर ती स्त्री गरीब आणि कुटुंबियांच्या विरोधात राहणारी असते. जर या स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर ती धनवान आणि कुटुंबियांचे सुख प्राप्त करणारी असते.
> कुंडलीतील तृतीय भाव ज्याला सहज भाव असे म्हणतात, यामध्ये केतू असेल तर स्त्री धनवान आणि शत्रूंवर विजय प्राप्त करणारी असते. अशा स्त्रियांना मुलांकडून सुख मिळते परंतु आपल्या लहान भावाचे प्रेम मिळत नाही.
> कुंडलीतील चतुर्थ स्थान जे सुखकारक स्थान मानले जाते, यामध्ये केतू असेल तर स्त्री मातृत्वाच्या सुखापासून वंचित राहते. वडिलांची आर्थिक स्थिती आणि संपत्ती क्षीण होत जाते.
> ज्या स्त्रियांच्या कुंडलीत पंचम स्थान जे मुलाचे स्थान आहे. यामध्ये केतू असेल तर स्त्रीला मुलाचे सुख प्राप्त होत परंतु लहान बहिण, भावाचे सुख मिळत नाही. अशा स्त्रिया कधीकधी भांडखोर प्रवृत्तीच्या होतात. कोणतेही काम या स्त्रिया कुशलतेने पूर्ण करतात.
> कुंडलीतील षष्ठम स्थान जे रिपु (शत्रूंचे) स्थान आहे. यामध्ये केतू असल्यास स्त्रीला शत्रू आणि आजारांची भीती राहत नाही. यांच्याजवळ जमीन, गाय, म्हैस अशी संपत्ती असते. कधीकधी यांचे मन लहान होते आणि याच कारणामुळे चुकीचा निर्णय घेतात.
> कुंडलीतील अष्टम स्थान मोक्षकारक स्थान आहे. यामध्ये केतू असल्यास स्त्रीला गुप्तरोग होणायची शक्यता असते. या रोगामुळे अशा स्त्रिया पतीला त्रास देणाऱ्या असू शकतात.
> ज्या स्त्रियांच्या कुंडलीत नवम स्थानामध्ये केतू असेल तर, ती स्त्री दान-पुण्य करणारी असते. नवम स्थान जे धर्मकारक स्थान असल्यामुळे, यामध्ये केतू असल्यास स्त्री गुणवान मुलाला जन्म देणारी, व्रत, तप, दान-धर्म करणारी असते.
> कुंडलीतील दशम स्थान कर्मकारक स्थान आहे. यामध्ये केतू असल्यास स्त्री कष्ट करणारी असते परंतु वडिलांच्या सुखापासून वंचित राहते. जर स्त्रीची रास कन्या असेल आणि दशम स्थानामध्ये केतू असेल तर, त्या स्त्रीला नेहमी धन-धान्य, सुख,वैभवाची प्राप्ती होत राहते.
> कुंडलीतील एकादश स्थान लाभाचे स्थान आहे. यामध्ये केतू असल्यास स्त्रीला प्रत्येक कामामध्ये धनलाभ होतो. सौभाग्य प्राप्त होते. अशी स्त्री मधुरवाणी, सुंदर आणि धर्म जाणणारी असते.

> कुंडलीतील द्वादश स्थान व्यव स्थान असते. यामध्ये केतू असल्यास स्त्रीला डोळे आणि पायाचे आजार होण्याची शक्यता असते. या स्त्रिया व्यर्थ खर्च करणाऱ्या आणि पतीला त्रास देणाऱ्या असतात.शत्रूवर सहज विजय प्राप्त करतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.