www.24taas.com, मुंबई
आजकाल फ्लॅट सिस्टममुळे घरातील अडगळ ठरणाऱ्या वस्तून पोटमाळ्यावर किंवा पलंगाखाली ठेवण्यात येतं. पोटमाळ्यावर अशा वापरात नसलेल्या वस्तू, भंगार ठेवण्यास काही समस्या नाही. मात्र अशा वस्तू पलंगाखाली ठेवू नयेत. आपण ज्या पलंगावर झोपतो, त्या पलंगाखाली असेलल्या वस्तू आपल्यावर प्रभाव टाकत असतात, असं शास्त्रात सांगितलं आहे.
आपल्या पलंगाखाली किंवा पलंगामध्ये जुन्या गाद्या, अंथरुणं, वापरात नसलेले कपडे अशा गोष्टी ठेवणं अशुभ मानलं जातं. अशा वस्तू आपल्या झोपेच्या ठिकाणी असल्यास त्यांचा आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. निरुपयोगी आणि अनावश्यक वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निरमाण करतात.
अशा ठिकाणी झोपल्यास आळशीपणा वाढतो. सुस्ती येऊ लागते. निरुत्साह वाढीस लागतो. याशिवाय अनेक प्रकारचे आजार होतात. आजारपणाच्या काळात आपण अशा पलंगावर झोपलो, तर आजारपणातून उठायला वेळ लागतो. त्यामुळे अनावश्यक सामान घरात ठेवू नये.