मुंबई : अनेकांच्या घरात अॅक्वेरियम असतात. काहींना मासे पाळण्याची सवय म्हणून तर काहीजण घरात आकर्षक वस्तू असावी म्हणून अॅक्वेरियम ठेवतात. फेंगशुईनुसार अॅक्वेरियमचेही वेगळी महत्त्व आहे. फिशटँकमधील मासे घरावर येणाऱ्या समस्यांना टाळतात. फेंगशुईनुसार फिशटँकमध्ये माशांची संख्या किती असावी यालाही महत्त्व आहे. फिशटँकमध्ये माशांची संख्या कमीतकमी नऊ असली पाहिजे. ज्यात आठ मासे लाल आणि सोने असावेत आणि एक मासा काळ्या रंगाचा असावा.
फिशटँक नेहमी पूर्व, उत्तर अथवा ईशान्य दिशेला असावा. या दिशा फिशटँक ठेवण्यासाठी चांगल्या मानल्या जातात. फिशटँकला कधीही बेडरुम अथवा किचनमध्ये ठेवू नये. घरातील सदस्यांमध्ये नेहमी आपुलकी जपून रहावी यासाठी मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवावा.
फिशटँकमध्ये काळ्या रंगाच्या माश्याला वेगळे महत्त्व प्राप्त आहे. काळ्या रंगाचा मासा सुरक्षेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे काळ्या रंगाचा एक मासा नेहमी फिशटँकमध्ये असावा. तसेच जेव्हा एखादा मास मारतो तेव्हा त्याच्या जागी नवा मासा आणावा. ज्या रंगाचा मासा मेला त्याच रंगाचा मासा आणावा. फेंगशुईनुसार जेव्हा एखादा मास मरतो तेव्हा त्या घरातील समस्या तो आपल्यासोबत घेऊन जातो.