www.24taas.com, मुंबई
पैसा, धन आज सगळ्याच माणसांची प्रथम गरज बनली आहे. भरपूर पैसा मिळवण्यासाठी काही माणसे बरीच मेहनत करतात... पण हवा तेवढा पैसा त्यांना त्याच्यातून मिळत नाही, तर काही जणांना चांगले मानधन असून देखील त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. जोतिषशास्त्रात यासाठी बरीच कारणे सांगण्यात आली आहेत. आपल्या हातात धन टिकून राहण्यासाठी आपल्यावर लक्ष्मीची क़ृपा असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. लक्ष्मीची कृपा त्याच व्यक्तींवर होत असते जे कुकर्मापासून दूर राहतात.
पैसे टिकवण्यासाठी काय कराल
सुर्योदयानंतर झोपणे, सूर्यास्ताच्या वेळी झोपणे, आणि दिवसा झोपणार्यां क़डे लक्ष्मी टिकून राहत नाही.
रात्री दह्याचं किंवा दिवसा दुधाचे सेवन केल्यानं लक्ष्मीचा नाश होतो.
अस्वछ घरात लक्ष्मीचे निवास नसते त्यामुळे आपले घर नेहमी स्वछ ठेवा.
कुठल्याही दिवशी खास करून गुरूवारी मोठ्याने बोलणे अथवा भांडण केल्याने पैसा टिकत नाही.
ज्या घरामध्ये पती आणि पत्नीमध्ये भांडण होतात तिथे लक्ष्मीची कृपा राहत नाही.
ज्या घरात रात्री खरक टे भांडे ठेवले जातात तिथे लक्ष्मीचा वास राहत नाही.
वरील गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिले तर धानासंबधीच्या अडचणींपासून तुमची सुटका होईल आणि मक्ष्मीची कृपा राहण्यास मदत होईल.