हनुमान अजूनही जिवंत ?

पवनपूत्र हनुमानाचं धैर्य, शौर्य आणि ताकद याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. हनुमानाचे जगभरामध्ये अनेक भक्तही आहेत. या कोट्यवधी भक्तांचं दैवत म्हणजेच हनुमान अजून जिवंत आहे का ? रामायण-महाभारतामध्ये असलेला हनुमान अजूनही जिवंत असल्याचे दाखले दिले जातात.

Updated: Feb 4, 2016, 06:49 PM IST
हनुमान अजूनही जिवंत ? title=

मुंबई: पवनपूत्र हनुमानाचं धैर्य, शौर्य आणि ताकद याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. हनुमानाचे जगभरामध्ये अनेक भक्तही आहेत. या कोट्यवधी भक्तांचं दैवत म्हणजेच हनुमान अजून जिवंत आहे का ? रामायण-महाभारतामध्ये असलेला हनुमान अजूनही जिवंत असल्याचे दाखले दिले जातात.

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या मृत्यूबाबत आपण गोष्टी ऐकल्या आहेत, पण हनुमानाचं नेमकं काय झालं याबाबत मात्र कोणत्याच हिंदू धर्माच्या ग्रंथामध्ये उल्लेख नाही. हनुमान हा चिरंजिवी आहे. चिरंजिवी म्हणजे जो कधीही मरू शकत नाही. जगामध्ये फक्त 8 गोष्टी चिरंजिवी आहेत, ज्यात हनुमानही आहे, असं बोललं जातं.

 

रामायण आणि महाभारताच्या काळामध्येही हनुमान असल्याचं ग्रंथांमध्ये लिहिलं गेलं. श्रीरामाचा उदय ज्या त्रेता युगात झाला, आणि त्यानंतर श्रीकृष्णाच्या द्वापार युगामध्ये हनुमान जिवंत असल्याचं सांगितलं गेलं.

बहुतेक हनुमानाच्या मंदिराशेजारी आपल्याला माकडं दिसतात, मंदिराशेजारी अशी माकडं असणं हा योगायोग आहे का ?

हनुमान या कलयुगातही जिवंत आहे, पण तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण श्रीरामाचा भक्त जेव्हा त्याचा धावा करतो, तेव्हाच हनुमान आसपास असल्याचा अनुभव येतो, असं बोललं जातं.