तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी किती लकी आहे?

मोबाईलच्या एका नंबरवरुन आपण हल्ली किती कामे सहजतेने करु शकतो. पैसे ट्रान्सफरचे काम असेल अथवा अन्य कामे. 

Updated: Feb 24, 2016, 11:08 AM IST
तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी किती लकी आहे? title=

नवी दिल्ली : मोबाईलच्या एका नंबरवरुन आपण हल्ली किती कामे सहजतेने करु शकतो. पैसे ट्रान्सफरचे काम असेल अथवा अन्य कामे. चुटकीसरशी आपण ही कामे करतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का अनेकदा हा मोबाईल नंबर आपल्यासाठी लकी अथवान अनलकी ठरु शकतो.

जर तुम्ही मोबाईलचा नवीन नंबर घेत असाल तर तुमच्या मूलांकानुसार नंबर घ्या. नव्या नंबरमधील सर्व अंक मिळून मूलांक काढा. तुमची जन्मतिथी हाच तुमचा मूलांक आणि शुभ अंक असतो. उदाहरणार्थ 8+5+6+7=26, 2+6=8 म्हणजेच तुमचा मूलांक झाला ८.

नवा नंबर घेताना मूलांकासह चढत्या क्रमाने नंबर असतील यावरही लक्ष द्या. कमीत कमी शेवटचे पाच अंक तरी चढत्या क्रमाने असायला हवेत. जसे 9850234689. 

अंक ज्योतिषानुसार नऊ आणि एक अंक शुभ मानला जातो. मोबाईल नंबरमध्ये हे दोन अंक अधिक वेळा असणे चांगले. 

तसेच विविध क्षेत्रातील लोकांसाठी विशेष असे शुभ नंबर आहेत. कला क्षेत्राशी संबंधिक लोकांसाठी चार अंक शुभ असतो.